Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

उद्योेगनगरीत लक्ष्मी आणि सरस्वतीला एकत्र आणण्याचा पिपरीतील भव्य संमेलनात चमत्कार

Date:

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचे संमेलनाच्या आयोजनाबद्दल गौरवोद्गार
आठ माजी संमेलनाध्यक्षांचा शिंदे यांच्या हस्ते हृद्य सत्कार
डॉ. पी. डी. पाटील यांचेकडून हयात माजी संमेलनाध्यक्षांसाठी १ लाख रुपयांचा कृतज्ञता निधी जाहीर
ग्यानबा-तुकाराम साहित्य नक्षरी, पिंपरी, पुणे ता. १५: पिंपरी-चिंचवडच्या साहित्य संमेलनात या उक्षेगनगरीतील लक्षीसोबत सरस्वतीलाही आणताना स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी हे संमेलन भव्य केेले आहे, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी काढले. निमित्त होते ते त्यांच्या हातून झालेल्या आठ माजी संमेलनाध्यक्षांच्या सत्काराचे. यावेळी स्वागताध्यक्ष डॉ. पाटील यांनी हयात असणार्‍या सर्व माजी संमेलनाध्यक्षांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा कृतज्ञता निधी देत असल्याचे जाहीर केले.
या सोहळ्यास माजी संमेलनाध्यक्षांपैकी नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. यू. म. पठाण, फ. मु. शिंदे, मधू मंगेश कर्णिक, विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे आणि माजी अध्यक्ष गंगाधर पानतवणे उपस्थित होते. ८८व्या साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, ८९व्या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यासह कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोर्‍हे, भारतीय जनता पक्षाचे खासदार अमर साबळे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, कार्यवाह प्रकाश पायगुडे, संमेलनाचे समन्वयक सचिन इटकर, ज्येष्ठ पत्रकार मधूकर भावे आणि अमेरिकेतील मराठी लेखक श्रीनिवास ठाणेदार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कवी उद्धव कानडे यांनी या सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.
पाटलांच्या वाड्यात उंचीच्या साहित्यिकांचा व वेशीबाहेरील लेखकांचा सन्मान झाला, असे सांगून शिंदे म्हणाले की, डॉ. पाटील यांना साहित्यिक मन आहे हा त्यातला सर्वात मोठा आनंदाचा भाग असून त्यांनी पूर्वसंमेलनाध्यक्षांची पूजाच केली आहे. आतापयर्र्त असे भव्य संमेलन झाले नाही आणि पुढच्या ५० वर्षातही होणार नाही असे कौतुकही शिंदे योनी केले. अमेरिकेपयर्र्त मराठी साहित्य गेलेल्या आपल्या साहित्याचे प्रवाहही बदलत्या समाजाच्या योग्यतेप्रमाणे बदलायला हवेत. त्यातून सर्वांना बरोबर नेणार समाज निर्माण होवो, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आपल्या प्रास्तविकातून स्वागताध्यक्ष डॉ. पाटील यांनी संमेलनाची गेल्या १३८ वर्षांच्या परंपरेचा गौरव केला. ते म्हणाले की, शक्य तितक्या जास्तीत जास्त माजी संमेलनाध्यक्षांना या संमेलनात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बोलावले हा आनंद मोठा आहे. यातूनच हयात असणार्‍या सर्व माजी संमेलनाध्यक्षांसाठी कृतज्ञता निधीची घोषणा डॉ. पाटील यांच्या वतीने संमेलनाचे समन्वयक इटकर यांनी केली. या कार्यक्रमास येऊ न शकणार्‍या निमंत्रित माजी संमेलनाध्यक्षांनाही हा निधी देण्यात येईल, असे इटकर म्हणाले.
८८व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, त्यांनी या व्यासपीठावर माजी संमेलनाध्यक्षांचा ऑल इन वन सत्कार केला, ही अतिशय संस्मरणीय बाब आहे.
राजकीय असूनही सात्विक आणि सास्कृतिक महत्व जपणारे शिंदे आणि स्वागताध्यक्ष डॉ. पाटील यांच्यामुळे सर्व पूर्वाध्यक्षांचा सन्मान संमेलनाच्या व्यासपीठावर शक्य झाला. वेगवेगळ्या अर्थाने हे संमेलन भव्यताच दर्शवत असून त्यातून मराठी भाषा आणि संस्कृतीचे ऋण फेडण्यासाठी डॉ. पाटील आणि इटकर त्यांचे प्रयत्न सिद्धीस जातील, याचे मला समाधान वाटते.
अंदमान येथे भरलेल्या विश्‍व साहित्य संमेलनापेक्षा पिंपरीतील संमेलनास सर्वात जास्त रसिकांची उपस्थिती असल्याबद्दल शेषराव मोरे यांनी आनंद व्यक्त केला, तर माजी संमेलनाध्यक्षांचा इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेला सत्कार यापूर्वी एकाही संमेलनात झाला नसल्याचे डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी सांगितले.
सत्ता व साहित्य हे ऊनुक्रमे समकालिन आणि शाश्‍वत असून त्यांचे नाते प्रियकर प्रेयसीचे समांतर असणार्‍या वीणेच्या तारांसारखे असते. म्हणूनच तरुण साहित्यिकांनी यासाठी कलेसाठी आयुष्य वेचणार्‍यांकडे पाहावे, तरच उद्या मराठी साहित्यात नोबेल पुरस्कारविजेता लेखक निर्माण होईल, असे डॉ. द. भि. कुलकर्णी म्हणाले.
साहित्य संमेलन हे मराठी भाषा आणि संस्कृतीचा महोत्सव असून तुकोबांच्या प्रदेशात हा काकणभर अधिक उल्साहाने साजरा केला जात असल्याबद्दल आनंद वाटतो. माझ्या संमेलनाध्यक्षपदाची फलश्रुती म्हणजे आधुनिक कवी केशवसूत यांचे भव्य स्मारक मालगुंड येथे उभारू शकलो, असे मधू मंगेश कर्णिक यांनी सांगितले.
डॉ. पाटील यांच्या नेतृत्वाखालील हे संमेलन तुकोबा आणि ज्ञानोबांच्या संगतीत मराठीचा लोकोत्सव कळसावर नेऊन ठेवणारा होत आहे, असे उल्हास पवार म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...