पुणे- सर्व शहरात निव्वळ शाळा कॉलेजेस करून भागणार नाही तर आता यापुढे त्यासमवेत गोशाळा हि उभ्या राहिल्या पाहिजेत .. तरच देशभरातील गायींचे संरक्षण आणि संवर्धन होईल असे प्रतिपादन येथे कोइमतूर चे समाजसेवक मोतीलाल राठोड यांनी केले.
पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे मोठ्या शानदार अशा २८ व्या , श्री सादडी (रानकपूर) जैन स्नेह संमेलनाच्या व्यासपीठावर ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्सिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया,संघाचे अध्यक्ष जेवरचंदजी बाफना ,उपाध्यक्ष खुबिलाल सोलंकी , सचिव राजेंद्र सोलंकी,धर्मेंद्र पोरवाल,संदीप सोलंकी, कांतीलाल पालरेचा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .
श्री राठोड पुढे म्हणाले ,’म्हशिंपेक्षा गायींचे अस्तित्व मानवी जीवनास अत्यंत उपयुक्त असे आहे. धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक दृष्ट्या गायींचे अस्तित्व मानवी आरोग्यासाठी खूप फलदायी आहे .हे लक्षात घेण्याची गरज आहे . मात्र त्याकडे दुर्लक्ष करून गायीच्या अस्तित्वाला धार्मिक स्वरूप दिले जाते. सादडी जैन समाजाच्या धार्मिकतेमधील मुलतत्वांची आणि नियमांची सर्व वैज्ञानिक पातळीवर कोणत्याही कसोटीवर तपासणी केली तर ती सर्वश्रेष्ठ च आहेत असे स्पष्ट होईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले .
सांस्कृतिक कार्यक्रमासह , दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच समाजात विविध स्तरावर आपले योगदान देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी प्रमुख पाहुण्यांचे हस्ते गौरव करण्यात आला .
राजेंद्र सोलंकी, अंकित शोंड यांनी स्वगत केले तर धर्मेंद्र पोरवाल यांनी आभार मानले .
शाळा कॉलेजेस बरोबर गोशाळा ही हव्यात … मोतीलाल राठोड
Date:

