पुणे- खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्यावर भाजपच्या शहरातील राजकारणाला कलाटणी मिळाली असली तरी आता बापटांचा वारसा घेऊन त्यांच्या सुनबाई स्वरदा बापट आणि बापटांचे कट्टर समर्थक कार्यकर्ते बाप्पू मानकर निवडणूक रणांगणात उतरले आहेत आज या नव्या तरुणाईने १० वर्षाहून अधिक काल राजकीय कारकीर्दीच्या अनुभवानंतर भाजपा टीम एकत्र करून कसब्याच्या आमदारांना बरोबर घेऊन आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
आज पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २५ महात्मा फुले मंडई – शनिवार पेठ प्रभागातून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सौ. स्वप्नाली नितीन पंडित, श्री. राघवेंद्र बाप्पू मानकर, सौ. स्वरदा गौरव बापट, श्री. कुणाल शैलेश टिळक यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
कसबा विधानसभा मतदारसंघ आणि प्रभाग २५ च्या विकासासाठी आपल्या माध्यमातून सातत्याने कार्य सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार आणि पुणे महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टी शहराच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिक भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना सेवा करण्याची संधी देतील, असा ठाम विश्वास आहे.असे यावेळी आमदार हेमंत रासने यांनी म्हटले.

