क्षितिजा व्यवहारे खून खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा-उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील नियुक्ती करा

Date:


आमदार माधुरी मिसाळ यांची मागणी
पुणे, ता. २२ ऑक्‍टोबर : बिबवेवाडीतील अल्पवयीन मुलीच्या खूनाच्या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा आणि या खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी आमदार माधुरी मिसाळ यांनी केली आहे.
मिसाळ म्हणाल्या, ‘गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली आहे. वळसे-पाटील यांच्या सुचनेनुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे निवेदन दिले आहे. पोलीस आयुक्तालयामार्फत लवकरच राज्य शासनाकडे याविषयीचा प्रस्ताव पाठवला जाईल.’   
क्षितिजा व्यवहारे या आठवीत शिकणार्या चौदा वर्षे वयाच्या मुलीचा एक तरुण आणि त्याच्या साथीदारांनी बिबवेवाडीतील यश लॉन्स परिसरामध्ये धारदार कोयत्याने मानेवर वार करून खून १२ ऑक्‍टोबरला संध्याकाळी खून केला होता. ती कबड्डी खेळाडू होती. यश लॉन्स परिसरात ती कबड्डीचा सराव करीत होती. या गंभीर घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.

अनेक गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असतो. खरं तर अशाप्रकारचे गुन्हे करण्यासाठी काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक अल्पवयीन मुलांचा गैरवापर करीत असतात. कायद्यातील तरतुदींमुळे ही मुले निर्दोष सुटतात. त्यामुळे कायद्यात बदल करणे आवश्यक वाटते. विधिमंडळात आणि कायदे तज्ज्ञांशी सविस्तर चर्चा करून या बाबतचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवावा, अशी ही मागणी  मिसाळ यांनी केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरद पवार यांची प्रकृती पुन्हा खालावली:डिहायड्रेशनमुळे अशक्तपणा, पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात दाखल

पुणे:राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार...

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून:विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार; अजित पवारांच्या अपघाताबाबत संशय

सत्ताधारी पक्ष मस्तीमध्ये असल्याची टीका,घरगुती डिजिटल मीटरचा विरोध,सोलार...

आत्मचरित्र लिहिण्यास बंदी हि तर विचार स्वातंत्र्याची गळचेपी, स्वातंत्र्यावर गदा: अनंत गाडगीळ

मुंबई:माजी लष्कर प्रमुखांच्या पुस्तकातील एका संदर्भाचा संसदेत उल्लेख झाल्यांनतर...

रेड जायंट मूव्हीजच्या ‘KHxRK’मुळे 47 वर्षांनंतर कमल हासन आणि रजनीकांत एकत्र

रेड जायंट मूव्हीजच्या आगामी चित्रपट ‘KHxRK’ मुळे भारतीय चित्रपटसृष्टी...