
माहिती अधिकार कट्ट्याचे दीड शतक …
पुणे-मॉडेल कॉलनीमधील चित्तरंजन वाटिकेत मागील १ जानेवारी २०१४ रोजी सुरू झालेल्या माहिती अधिकार कट्टय़ाला आता उत्तम प्रतिसाद मिळत असून येत्या रविवारी म्हणजे १६ ऑक्टोबर २०१६ रोजी १५० वा कट्टा पार पडणार आहे. गरजू नागरिकांबरोबरच आजी माजी अधिकारी आणि कर्मचारीही आता कट्ट्यावर येउन विचारांचे आदान प्रदान करू लागले आहेत. कट्ट्यावर गरजूंना आवश्यक ते मार्गदर्शन मिळत असते. माहिती अधिकार क़ट्ट्यावर आता माहिती अधिकाराबरोबरच सेवा हमी कायद्याबाबतही मार्गदर्शन केले जाते .
सरकारी सेवा, सुविधा मिळवताना जनतेला रखडपट्टीचा अनुभव येतो. त्यातून राज्यातील जनतेची सुटका व्हावी या हेतूने राज्य सरकारने सेवा हमी कायदा लागू केला.सेवा हमी विधेयकामुळे नागरीकांना सरकारी सेवा ठराविक मुदतीत उपलब्ध करुन देणे बंधनकारक झाले आहे.तरीही या कायद्याचा वापर करतानाही लोक़ांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामूळे कट्ट्यावर आता माहितीअधिकाराबरोबरच सेवा हमी कायद्याच्या वापराविषयीही मार्गदर्शन केले जाते. प्रत्येक नागरिक माहिती अधिकार कायद्याबाबत तसेच सेवा हमी कायद्यासं दर्भात सबल, आत्मनिर्भर व्हावा हा या उपक्रमा मागील हेतू आहे. कट्टय़ावर माहिती अधिकाराबरोबरच सेवा हमी कायद्याविषतयीही प्रश्न विचारता येतात, मते मांडता येतात, अडचणी मांडता येतात, चर्चा करता येते परंतु कोणीही मार्गदर्शकाच्या भूमिकेत नसते.आपसातील चर्चेतून गरजूंना आवश्यक ते मार्गदर्शन मिळत असते.
माहिती अधिकार कट्टा रविवार दि. १६ ऑक्टोबर २०१६ , चित्तरंजन वाटिका, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर पुणे येथे, सकाळी साडेनऊ ते साडेदहा या वेळेत (संपर्क: विजय कुंभार – ९९२३२९९१९९) .