पुणे :
‘रोटरी डिस्ट्रीक्ट पुणे 3131’ च्या वतीने पाण्याची बचत करणार्या संस्थांना ‘रोटरी वॉटर पुरस्कारा’ने गौरविण्यात आले.
नुकताच झालेला हा
पुरस्कार
मराठवाड्यातील साखर उद्योगाला नवी दिशा देणारे बी. बी.
ठोंबरे यांच्या हस्ते
नुकताच
प्रदान
करण्यात आला
,
अशी माहिती पुरस्काराचे संयोजक सतीश खाडे यांनी दिली.
हा पुरस्कार पाणी संवर्धन, पाणी बचत, पाणी पुर्नवापर आणि पाणी गुणवत्तेवर काम करणार्या कंपन्यांना देण्यात आला. अशा प्रकारचा पुरस्कार प्रथमच कंपन्यांना देण्यात आला हे या पुरस्काराचे वैशिष्टय आहे,
या पुरस्कार सन्मान सोहळ्यामध्ये ‘
दॅटवायलर
फार्मा पॅकेजिंग प्रा.लि.’(
Datwyler Pharma Pvt. Ltd.), ‘विपणन अॅनॅलिटीकल टेक्नॉलॉजिस्’ (Vipanan Analytical Technologies), ‘केहीन फाय प्रा.लि.’ (Keihin Fie Private Limited), ‘एसीजी कॅरेस फाउंडेशन’ (ACG cares foundation), ‘प्रीव्हि ऑर्गनिक्स लि.’ (Privi organics ltd)
, ‘एन्ड्युरन्स टेकनॉलॉजिस लि.’
(Endurance Technologies Ltd.), ‘महाड म्यानुफॅक्चरिंग असोसिएशन’ (Mahad Manufacturing Association)
या कंपन्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी रावसाहेब बढे, ’रोटरी क्लब डिस्ट्रीक्ट 3131’चे अभय गाडगीळ, ‘रोटरी क्लब ऑफ निगडी’ च्या अध्यक्ष डॉ. शुभांगी कोठारी, ‘रोटरी क्लब ऑफ पिंपरी’ च्या अध्यक्ष डॉ. विभा झुत्शी उपस्थित होत्या. ‘रोटरी क्लब ऑफ निगडी’ आणि ‘रोटरी क्लब ऑफ पिंपरी’ ने या कार्यक्रमाचे संयोजन केले होते.
प्रास्ताविकात बोलताना सतीश खाडे म्हणाले, ‘कंपन्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांनी केलेल्या पाणी विषयक कार्याचे इतरांना ज्ञान व्हावे. तसेच संशोधक आणि व्यावसायिक अभियंतांना नवीन व्यवसायाच्या संधी मिळाव्या हा प्रमुख उद्देश या पुरस्काराचा होता.’