पुणे-रुपी बॅंकेच्या ठेवीदार व खातेदारांना त्यांच्या खात्यातुन रु. २०,००० काढण्याची आर बी आय ने दिलेली परवानगी प्रत्यक्षात अमलात आणल्यास बॅक अवसायानात जाण्याचा धोका असून बॅंकेची गंगाजळी (Liquidity) सुमारे 400 कोटी रुपयाने कमी होइल व त्यामुळे अन्य कुठलीही राष्ट्रीयकृत बॅंक रुपी बॅंक विलीनीकरण करुन घेण्यास पुढे येणार नाही. यामुळे तात्पुरते २०,००० रु मिळाल्याचा आनंद क्षणभंगुर ठरेल आणि नजीकच्या काळात बॅंक अवसायानात जाऊन खातेधारक व ठेवीदारांचे उरलेले पैसे बुडण्याचा धोका स्पष्टपणे दिसतो आहे.खातेदार व ठेवीदारांच्या हितरक्षणासाठी हा निर्णय घातक असुन हा निर्णय रद्द करण्यासाठी जनांदोलन उभारण्यात येणार असल्याचे संदीप खर्डेकर,महेश लडकत ,धीरज घाटे ,गणेश घोष यांनी जाहीर केले आहे.
त्यांनी प्रद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि ,’याबाबत बॅंकेच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर यांच्याशी रुपी बॅंक बचाओ कृती समिती चे सदस्य श्रीरंग परस्पाटकी ,महेश लडकत,संदीप खर्डेकर,भालचंद्र कुलकर्णी यानी सविस्तर चर्चा केली व हा निर्णय चुकीचा असुन तो त्वरित मागे घ्यावा अशी आग्रही मागणी मांडली. या चर्चे दरम्यानच प्रशासक मंडळाच्या अन्य सदस्यानी या निर्णयास विरोध केला असल्याचे उघड झाले. याबाबत प्रशासकीय मंडळाचे सदस्य अरविंदराव खळदकर यांच्याशी संपर्क साधला असता ” श्री मुकुंद अभ्यंकर यांनी आर बी आय कडे हा विषय आग्रहपूर्वक मांडुन मंजुर करुन आणला असून आम्ही अन्य प्रशासक मंडळाचा यास विरोध आहे व तसे पत्र ही आम्ही सहकार आयुक्तास दिले आहे. या निर्णयाने खातेधारक व ठेवीदारांचे अतोनात नुक्सान होणार असुन हा निर्णय रद्दबातल करणे गरजेचे आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत रुपी बॅंकेच्या खातेदार व ठेवीदारांचा मेळावा आयोजित करुन या विषयातील धोका सर्वाना समजावून सांगणार असुन बॅंकिंग क्षेत्रातील अनेक मान्यवर या मेळाव्यास मार्गदर्शन करतील.तसेच खातेदार व ठेवीदारांच्या हितरक्षणासाठी असे निर्णय घातक असुन हा निर्णय रद्द करण्यासाठी जनांदोलन उभारण्यात येणार आहे.
रिझर्व बॅंकेच्या निर्णयाने रुपी बॅंक अवसायानात जाण्याचा धोका …खर्डेकर
Date:

