क्षितीची कसरत ‘सेलिब्रिटी’पद राखण्यासाठी!

Date:

आजकाल सर्वत्र फोफावलेल्या सोशल मीडियाच्या युगात सर्वसामान्यांपासून असामान्यांपर्यंत प्रत्येकाचीच या समाज माध्यमात दिसण्या-वावरण्याची स्पर्धा सुरु आहे. मग त्यात सेलिब्रिटीं कसे बरं मागे राहतील? त्यांच्यासाठी तर हे माध्यम सुवर्णमृगच जणू! पण आपल्या मराठी कलावंतांना याचे विशेष सोयरसुतक नाही. काही अपवाद वगळता आपलं काम भलं आणि आपण भले असा विचार करणारे मराठी कलावंत अजूनही आहेत! पण या ‘प्लॅटफॉर्मचा’ वापर न करणाऱ्यांविषयी त्यांचे फॉलोअर्स बोंबा मारताना दिसतात. अश्याच सेलिब्रिटींपैकी ‘क्षिती जोग’!

सध्या ह्या अभिनेत्रीची खूपच तारांबळ उडत आहे. पण ही तारांबळ सोशल मीडियासाठी नव्हे तर प्रयोगांसाठी आहे. तिचं नवं नाटक ‘Knock! Knock!सेलिब्रिटी’ आलं आहे. या नाटकात ती आणि सुमीत राघवन हे दोनच कलाकार आहेत. अर्थातच संपूर्ण डोलारा त्या दोघांवरच आहे. एकावेळी एकच कलाकार स्टेजवर सलग वावरत असल्याने त्याची दमछाक तर होणारच! त्यात क्षितीने आधी घेतलेल्या टीव्ही आणि चित्रपटांमुळे  तिची खरीखुरी ‘कसरत’ ‘Knock! Knock!सेलिब्रिटी’ साठी होताना दिसतेय. सकाळ-संध्याकाळ मालिकांचे चित्रीकरण त्यानंतर प्रयोग करून रात्री चित्रपटांचं चित्रीकरणही ती करतेय. जोगांच्या तिसऱ्या पिढीची हि शिलेदार इतकी दमूनही नाटकात तिची एनर्जी तसूभरही कमी पडू देत नाहीये. तिचं म्हणणं आहे, नाटक हे कलाकाराचं टॉनिक असतं! ते दमवत नाही तर माझा थकवा दूर करते! आणि ‘नॉक नॉक…. ‘  सारखं नाटक करायला मिळणं हेच माझं टॉनिक आहे.

-शरद लोणकर (9423508306)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...