लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि माय रोल मोशन पिक्चर्स निर्मित रिंगणचित्रपटाद्वारे अजय गोगावले पुन्हा एकदा पंढरपूरच्या विठाई ला साद घालण्यासाठी व समस्त श्रोत्यांना आपल्या तालावर नाचविण्यासाठी “देवपहिला” म्हणत सज्ज झालेला आहे.आजवर खेळ मांडला; असो किंवा डॉल्बीवाल्या बोलावं माझ्या डीजे ला असो कोणत्याही प्रकारचं गाणं असू देत त्याच्या प्रत्येक गाण्याने रसिकांच्या मनावर राज्य करणारा सैराटमय अजय रिंगणात अडचणीत सापडलेल्या एका बाप लेकाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखविण्यासाठी अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाला आपल्या सुरेल गाण्याने साद घालतं आव्हान करीत आहे. पांडुरंग आणि पंढरपूर म्हंटलं की अजयचं माऊली माऊली रूप तुझे… हे गाणं डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. या गाण्याने फक्त पंढरपूरच नव्हे तर अखंड महाराष्ट्र भारावून गेला होता.विधि कासलीवाल प्रस्तुत रिंगण या चित्रपटाची गाणी रोहीत नागभीडे यांनी संगीतबद्ध केलेली असून वैभव देशमुख याने ती लिहिलेली आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन मकरंद माने यांचे असून छायाचित्र दिग्दर्शन अभिजित अब्दे यांनी केले आहे. लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि माय रोल मोशन पिक्चर्स निर्मित रिंगण हा चित्रपट येत्या ३० जून ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

