भाजपा नगरसेविकेला अटकपूर्व जामीन मंजूर, ‘मार्ड’चा संपाचा इशारा

Date:

पुणे-ससून रुग्णालयातील महिला डॉक्टरला मारहाण करणाऱ्या भाजपाच्या नगरसेविका आरती कोंढरे यांना गुरुवारी न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने ससूनमधील डॉक्टरांनी संपाचा इशारा दिला आहे. पोलिसांनी आरती कोंढरे यांच्याविरोधात डॉक्टर संरक्षण कायदा हे कलम न लावल्याने त्यांना जामीन मंजूर झाल्याचा ‘मार्ड’चा आरोप असून पोलिसांनी या कलमाखाली गुन्हा दाखल करावा, अन्यथा संपावर जाणार, असा इशारा संघटनेने दिला आहे.

मंगळवारी मध्यरात्री रुग्णालयातील आपात्कालीन उपचार कक्षात सहा डॉक्टर नेमणुकीस होते. मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास भाजपा नगरसेविका आरती कोंढरे रुग्णालयात गेल्या. त्यावेळी डॉ. स्नेहल खंडागळे (वय २६) या एका रुग्णावर उपचार करत होत्या. तेव्हा कोंढरे यांनी रुग्णालयातील कक्षात आरडाओरडा करायला सुरुवात केली. तसेच डॉ. खंडागळे यांना एका रुग्णावर तातडीने उपचार करा, असे सांगितले. यावरुन कोंढरे यांनी डॉ. खंडागळे यांच्याशी वाददेखील घातला आणि त्यांनतर खंडागळे यांना मारहाण अशी खंडागळे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार  दिली होती. पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच कोंढरे यांच्यावतीने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला. या अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली असता न्यायालयाने कोंढरे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.

आरती कोंढरे यांना अटकपूर्व जामीन मंजूर होताच ‘मार्ड’ संघटना आक्रमक झाली आहे. पोलिसांनी डॉक्टर संरक्षण कायदा हे कलम न लावल्याने कोंढरे यांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे पोलिसानी डॉक्टर संरक्षण कायदा हे कलम लावून त्यांच्यावर कारवाई करून अटक करावी अन्यथा उद्या पासून ससूनमधील मार्ड संघटनेचे डॉक्टर संपावर जातील, असा इशारा ‘मार्ड’ने दिला आहे. तर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कामकाज बंद ठेवणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बोपोडीत ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय व्हावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

'ससून' ची विश्वासार्हता जपणे गरजेचे -पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रुग्णांची...

रेशन माफियांवर कडक कारवाई करूनशासनाने जरब बसवावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : गरीब, सामान्य नागरीकांसाठी असलेले रेशन वरील धान्य...

पुण्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता पुणे-मुंबई, पुणे-बेंगळुरू, पुणे-हैदराबाद या...

तर तेव्हा फडणवीस जनसंघी अनुयायांसह ‘मुग गिळुन’ गप्प का होते..?

मुंबई -दि २६ फेब्रू २०२६-काँग्रेस काळात मोगलांचा इतिहास १७...