धर्म हे जीवन जगण्याचे शास्त्र- डॉ. अशोक जोशी

Date:

पुणे: “ जीवन जगण्याचे शास्त्र धर्म आहे. यातूनच मानव हा शून्याच्या स्थितीला म्हणजेच अहंकारातून मुक्त होऊन शांततेच्या अवस्थेत पोहचू शकतो. तर दुसरीकडे विज्ञान हे अहंकाराचे प्रतिक आहे. यातून मानवाला केवळ दुखःच मिळू शकते. धर्म आणि विज्ञान यामध्ये धर्म श्रेष्ठ आहे.” असे विचार अमेरिकेतील जगविख्यात शास्त्रज्ञ डॉ. अशोक जोशी यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे जागतिक विज्ञान, धर्म आणि तत्त्वज्ञानावर आधारित सातव्या ऑनलाइन वर्ल्ड पार्लमेंटच्या पाचव्या सत्रात ‘आधुनिक, वैज्ञानिक संस्कृतीत धर्माची भूमिका,’ या विषयावर ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी युएसए येथील डॉ.कन्नन रंगरामानुजम, ऑस्ट्रेलियाच्या डॉ. एलिझाबेथ, अमेरिकेचे प्रा.विस्ताप कारभारी,  युएसएचे डॉ. बरिन जे ग्रीम, युएसचे प्रा.कोंडेन स्मिथ हंसेन आणि धिरज सिंग हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्रभारी कुलगुरू प्रा.डॉ.आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे आणि प्रा.डॉ. मिलिंद  पात्रे हे यावेळी उपस्थित होते.
डॉ. अशोक जोशी म्हणाले,“ शांतता हे अनंत आहे. शून्याच्या अवस्थेत जाणे म्हणजे शांती होय. प्रार्थनेतून रोज ओम शांतीचा उच्चार होतो त्यामुळे आपल्याला आत्मिक अनुभूती होते. भारतीय परंपरेनुसार या देशात प्रत्येक सणांमध्ये भक्तीचे वातावरण निर्माण होते. जे प्रत्येकाच्या मनाला प्रसन्नता देते. धर्म हे कर्तव्य शिकवते. त्यामुळे आपले कुटुंब, समाज आणि जगाचे कल्याण हे सर्वात आद्य कर्तव्य आहे. धर्माची सर्वात प्रथम भूमिका ही प्रत्येक मानवाला शांती प्रदान करणे आहे. त्याच प्रमाणे शिक्षितांची सर्वात मोठी भूमिका ही समाजात शांती प्रस्थापित करणे आहे. या देशात भगवान गौतम बुद्धांनी सतत १८ वर्ष शांततेच्या अवस्थेत होते तीच परंपरा विज्ञान युगात पुढे घेऊन जावयाची आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ धर्म म्हणजे कर्तव्य आहे. आपले माता पिता, कुटुंब, समाज, देश आणि विश्वासाठीचे. आज जगामध्ये धर्माच्या नावाखाली दहशतवाद, आतंकवाद, रक्तपात वाढत आहे. हे थांबविणे सर्वांचे कर्तव्य असून तरुणांनी पुढाकार घेऊन कार्य करावे.”
कन्नन रंगरामानुजम म्हणाले,“ आजच्या युगातील विज्ञानपेक्षा अंतर्गत विज्ञानाचे सुख हे सर्वात महत्वाचे आहे. भारतीय तत्वज्ञानुसार आपल्या ऋषिमुनींनी हिमालयात जाऊन तपश्चर्या केली आणि आत्मज्ञान मिळविले. धर्म किंवा अध्यात्म हे विज्ञानापेक्षा खूप प्रगत असून ते जीवनातील खरे सुख देते. मन आणि बुद्धिचा एकत्रित विचार करुन शरीराला आनंद मिळतो. सर्व धर्मांचा अर्थ हाच आहे की त्यांनी सर्व लोकांचे जीवनमान उंचावणे आहे. धर्म, विज्ञान आणि तत्वज्ञानाच्या एकत्रिकरणातूनच मानवाला मनःशांती मिळू शकते.”
डॉ. एलिझाबेथ म्हणाल्या,“ धर्माशिवाय विज्ञानाची परिभाषा पूर्ण होऊच शकत नाही. धर्म हे मानवाला जीवन जगण्याचे ज्ञान देते. तर विज्ञान हे काही काळाचे सुख देते. विज्ञान हे ज्ञान आहे पण धर्माची व्याख्या केली तर लक्षता येते की भारतीय तत्वानुसार हे योग आहे. शिक्षणाच्या तीन पद्धती आहेत. त्यात प्रथम शिक्षक आणि पुस्तकातून ज्ञान मिळते, दुसरे हे इंटरनेटच्या माध्यमातून आणि सर्वात महत्वाचे ज्ञान हे ऋषि मुनींकडून पारंपारिक अध्यात्म ज्ञान जे मानव उत्थानासाठी सर्वोत्तम आहे.”
प्रा.विस्ताप कारभारी म्हणाले,“ रोजच्या मानवी जीवनाच्या शर्यतीमध्ये त्याला कुठे तरी शांतीची गरज असते. विज्ञानाच्या जगात धर्मच मानवाला शांती देऊ शकतो. त्यासाठीच धर्माचे महत्त्व हे शब्दात सांगता येत नाही. गुरूच्या सानिध्यात घेतलेल्या शिक्षणामध्ये अपार शक्ती असून त्यातून जग बदलता येते.”
डॉ. बरिन जे ग्रीम यांनी विज्ञान आणि धर्माचा भेद सांगून जीवन जगण्याची पद्धत सांगितली.
तत्पूर्वी युएसए येथील दादा गुणामुक्तांनद, नेदरलँड श्रध्दानंद शितल, युके येथील विनोद सुब्रमण्यम, डॉ. दियाना कोलोमन व धिरज सिंग यांनी ‘शांतीचा अधिकार-मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा’ या चौथ्या सत्रात विचार मांडले.
दादा गुणामुक्तांनद यांनी संपूर्ण जगातील मानव, प्राणी आणि निसर्गावर प्रेम करण्याचा संदेश दिला. अहिंसा हे शांतीचे सूत्र आहे. प्रेमाशिवाय जगात शांती निर्माण होऊच शकत नाही. त्यामुळे युवकांनी धर्म आणि अहिंसेच्या तत्वाचे पालन करावे.
विनोद सुब्रमण्यम म्हणाले, जगाला नियंत्रित व संतुलीत करण्यासाठी विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय महत्वाचा आहे. धम्माची तत्वे ही शांती आणि अहिंसा आहे. त्यातील खरा संदेश हा मानव जातीच्या कल्याणासाठीच आहे. समाजात शांती हवी असेल तर समानता, समानधिकार आणि समान न्याय यांचा एकत्रित विचार व्हावा.
श्रध्दानंद शितल म्हणाले, मानवी अधिकार आणि शांतीसाठी सम्राट अशोक यांनी खूप मोठे कार्य केले आहे. तसेच काळाच्या ओघात १९४८ च्या महायुद्धात बरेच लोक मारले गेले त्यानंतर सृष्टीवर बरेच बदल होत गेले. परंतू मानवाने सदैव शांती निर्मितसाठीच प्रयत्न केले आहे.
जागतिक युवा शांतीः कल्पना, अनुभव, प्रणाली ’ या तिसर्‍या सत्रात डॉ. मासिमो सागरिज, जार्जीया वॅन सायलिनबर्ग, अफगाणिस्तान प्रो. ओमीद वाली , सेल्व्लान मतेजा स्टॅनस्लिव्हा रॉट  व श्रीलंका साजी प्रलिस यांनी विचार मांडले.यांनी आपल्या भाषणातून जगात शांती निर्मितीसाठी युवकांची भूमिका किती महत्वाची आहे हे सांगितले. जागतिकीकरणाच्या काळात आजच्या युवकांनी मानवातील भेदा भेद संपुष्टात आणला आहे. शेजारील राष्ट्रांबरोबर सलोख्याचे संबंध स्थापित झाले आहे. पण काही ठिकाणी अशी स्थिती राहिलेली नाही. त्यामुळेच युवकांनी आंतरराष्ट्रीय शांततेसाठी समोर यावे. हे कार्य करतांना युवकांसमोर सामाजिक, राजकीय, आर्थिक, कायदे आणि काही प्रमाणात डिजिटल युगातील मर्यादा येतील. ते सांभाळूनच शांतीचे कार्य करावे.
प्रा. डॉ. अनंत चक्रदेव यांनी स्वागतपर भाषण केले.
प्रा.डॉ. चयनिका बासू यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जयंत  खंदारे व डॉ. नचिकेत ठाकूर यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...