Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

राजीव गांधी हत्येतील सर्व 6 दोषींची सुटका

Date:

संतापजनक : नलिनी यांच्या सुटकेचा आनंद म्हणून फटाके फोडले ,पेढे वाटले ..ANI ने जारी केलेला व्हिडीओ सर्वात खाली पहा ..

नवी दिल्ली-राजीव गांधी हत्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा निकाल दिला आहे. न्यायालयाने सर्व 6 दोषींना सोडण्याचे आदेश दिले. यामध्ये नलिनी आणि आरपी रविचंद्रन यांचा समावेश आहे. यानंतर जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व दोषींची सुटका करण्यात आली आहे.माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची LTTE संघटनेने तामिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथे आत्मघाती बॉम्बहल्ल्याच्या मदतीने २१ मे १९९१ रोजी हत्या केली होती.

दरम्यान राजीव गांधी यांच्या हत्येतील सहा दोषींपैकी एक असलेल्या नलिनी श्रीहरन यांची तुरुंगातून सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यानंतर त्यांच्या समर्थकांकडून वेल्लोरमधील त्यांच्या निवासस्थानाजवळ फटाके फोडण्यात आले आणि मिठाई देखील वाटण्यात आली आहे. याचा व्हिडीओ एएनआयने जारी केला आहे.

18 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील दोषी पेरारिवलनला सोडण्याचे आदेश दिले होते. उर्वरित दोषींनीही याच आदेशाचा हवाला देत कोर्टाकडून सुटकेची मागणी करण्यात आली होती. नलिनी आणि रविचंद्रन या दोघांनी 30 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात घालवला आहे.

राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी नलिनी यांना अटक झाली तेव्हा ती गर्भवती होती. तिला गरोदर होऊन दोन महिने झाले होते. त्यानंतर सोनिया गांधींनी नलिनी यांना माफ केले. अद्याप जगात न आलेल्या नलिनीच्या चुकीची शिक्षा एका निष्पाप मुलाला कशी दिली जाऊ शकते, असे त्या म्हणाल्या होत्या.

1984 मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला तीन चतुर्थांश जागा जिंकण्यात यश आले होते. त्यावेळी काँग्रेसने 533 पैकी 414 जागा जिंकल्या होत्या. राजीव पंतप्रधान झाले तेव्हा त्यांचे वय अवघे 40 वर्षे होते. ते देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात शाळांमध्ये संगणक बसविण्याची व्यापक योजना आणली. राजीव गांधी यांच्या कार्यकाळात जवाहर नवोदय विद्यालयांची स्थापना झाली. पीसीओच्या माध्यमातून गावोगावी दूरध्वनी पोहोचला.

यादरम्यान त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही करण्यात आले. शीख दंगल, भोपाळ गॅस घटना, शाह बानो प्रकरण, बोफोर्स घोटाळा, काळा पैसा आणि श्रीलंका धोरणावर राजीव सरकारवर टीका झाली. त्यामुळे निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि व्हीपी सिंह यांचे सरकार स्थापन झाले. हे सरकार 1990 मध्ये पडले आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने चंद्रशेखर यांचे सरकार स्थापन झाले. हे सरकारही 1991 मध्ये पडले आणि निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकांच्या प्रचारासाठी राजीव तामिळनाडूला गेले होते. जिथे त्यांची हत्या झाली.

राजीव यांनी त्यांच्या कार्यकाळात श्रीलंकेत शांती सेना पाठवली होती, त्यामुळे तामिळ बंडखोर संघटना LTTE (लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम) त्यांच्यावर नाराज होती. 1991 मध्ये राजीव गांधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी चेन्नईजवळील श्रीपेरंबदुर येथे गेले होते, तेव्हा एलटीटीईने राजीव यांच्यावर आत्मघातकी हल्ला केला.

राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी तामिळनाडूमधील श्रीपेरुंबदुर येथे निवडणूक सभेदरम्यान धनू नावाच्या LTTE आत्मघातकी बॉम्बरने हत्या केली. एलटीटीईची महिला दहशतवादी धनू (तेनमोजी राजरत्नम) हिने राजीव गांधींना फुलांचा हार घातल्यानंतर त्यांच्या पायाला स्पर्श केला आणि खाली वाकून कमरेला बांधलेल्या स्फोटकांचा स्फोट केला. हा स्फोट एवढा जोरदार होता की अनेकांचे तुकडे झाले. राजीव गांधी आणि हल्लेखोर धनू यांच्यासह 16 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 45 जण गंभीर जखमी झाले.

राजीव गांधी हत्येप्रकरणी ट्रायल कोर्टाने कटात सहभागी असलेल्या 26 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. मे 1999 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने 19 जणांची निर्दोष मुक्तता केली. उर्वरित सात आरोपींपैकी चार आरोपींना (नलिनी, मुरुगन ऊर्फ ​​श्रीहरन, संथन आणि पेरारिवलन) मृत्युदंड आणि उर्वरित (रविचंद्रन, रॉबर्ट पायस आणि जयकुमार) यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. चौघांच्या दयेच्या अर्जावर तामिळनाडूच्या राज्यपालांनी नलिनी यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली. उर्वरित आरोपींचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी 2011 मध्ये फेटाळला होता.

दरम्यान राजीव गांधी यांच्या हत्येतील सहा दोषींपैकी एक असलेल्या नलिनी श्रीहरन यांची तुरुंगातून सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यानंतर त्यांच्या समर्थकांकडून वेल्लोरमधील त्यांच्या निवासस्थानाजवळ फटाके फोडण्यात आले आणि मिठाई देखील वाटण्यात आली आहे. याचा व्हिडीओ एएनआयने जारी केला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भविष्याची भक्कम पायाभरणी: १,४५० तरुण मुलींना भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी एलपीएफ शिष्यवृत्ती मिळाली

पुणे, : “शिक्षणाचा उद्देश आरशांचे खिडक्यांमध्ये आणि खिडक्यांचे दरवाजांमध्ये...

भारतातील लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत..अनंत गाडगीळ

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी...