खंबीर व्यक्‍तिमत्त्व निर्माणासाठी विवेकानंद एक प्रेरणा – ओंकार नाझरकर

Date:

‘यशस्‍वी’ संस्‍था व विवेकानंद केंद्राच्या वतीने राष्‍ट्रीय युवा दिन साजरा.*

पुणे – प्रचंड वेगवान स्‍पर्धा, धकाधकीचे जीवन, ढासळत चाललेली नीतीमत्ता अशा अस्‍वस्‍थ जीवनशैलीमध्ये सुद्धा खंबीर व्यक्‍तिमत्‍त्‍व निर्माण करता यावे यासाठी युवकांनी स्‍वामी विवेकानंद यांचे जीवनकार्य समजून घ्‍यावे, असे आवाहन व्याख्याते ओंकार नाझरकर यांनी व्यक्‍त केले.

स्‍वामी विवेकानंद जयंतीनिमित्‍त यशस्‍वी एज्‍युकेशन सोसायटी व विवेकानंद केंद्राच्या वतीने संस्थेच्या  इंटरनॅशनल इन्स्‍टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्‍या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्‍हणाले की, युवक-युवतींनी करिअरच्या स्‍पर्धेत मालमत्‍तेचे ध्येय समोर बाळगतानाच ‘नीतीमत्‍तेला’ही प्राधान्याने महत्‍त्‍व द्यावे, तसेच येणाऱ्या काळात जागतिक स्‍पर्धेत टिकून रहायचे असेल तर प्रत्‍येकाने आपण ‘भारतीय’ आहोत ही राष्‍ट्रीय एकात्‍मतेची भावना जोपासणे  आणि त्‍यानुसार कृती करणे गरजेचे आहे.

याप्रसंगी बोलताना ‘यशस्‍वी’ एज्‍युकेशन सोसायटीच्या ‘आयआयएमएस’ चे संचालक डॉ. मिलिंद मराठे म्‍हणाले की, युवकांनी भाषिक कौशल्‍यात निपुणता आणण्यासाठी प्रयत्‍नशील होणे गरजेचे आहे. बऱ्याचदा असे दिसून येते की, अभ्‍यासात व तांत्रिक कौशल्‍यात उत्‍तम असूनही केवळ आपले म्‍हणणे नीट, व्यवस्‍थितपणे मांडण्याची कला अवगत नसल्‍याने अनेक युवक-युवती पात्रता असूनही विविध करिअर व रोजगार संधीपासून वंचित राहतात.

यावेळी विवेकानंद केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्‍या वक्‍तृत्‍व सभेची अंतिम फेरी घेण्यात आली तसेच विजेत्‍यांना प्रमाणपत्र व पुस्‍तक बक्षीस स्‍वरुपात प्रदान करण्यात आले. स्‍पर्धेतील विजेत्‍यांमध्ये दोन गटात वरूण जोशी व स्‍नेहल आटोळे हे दोन विद्यार्थी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले तर सोमोजिता दास व वरूण चव्हाण यांना द्वितीय क्रमांक व कार्तिकी जाधव व पवन वाकेकर यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्‍कार देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचं प्रास्‍ताविक रोहित शेणॉय व सुत्रसंचालन प्रिया जोग यांनी तर आभार प्रदर्शन विवेकानंद केंद्राच्या चिंचवड शाखेच्या संचालिका अरुणाताई मराठे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला ‘यशस्‍वी’ एज्‍युकेशन सोसायटीचे अधिष्‍ठाता डॉ. राजेंद्र सबनीस,  राष्ट्रीय  सैनिक  संस्थेचे  महाराष्ट्र  विभाग प्रमुख प्रताप भोसले, विवेकानंद केंद्राचे पदाधिकारी, ‘यशस्‍वी’ संस्‍थेचे कर्मचारी, वक्‍तृत्‍व स्‍पर्धेतील सहभागी विद्यार्थी व  पालक मोठ्या संख्येने उपस्‍थित होते.

या कार्यक्रमासाठी  पवन शर्मा,शाम वायचळ आदींनी विशेष सहकार्य केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणेकरांच्या अपेक्षांना जबाबदारीने सामोरे जाऊ – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे, प्रतिनिधी –पुणेकरांनी भाजपला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत उमेदवार...

औंध, बोपोडीत भाजपने उडवला विरोधकांचा धुव्वा, चारही उमेदवार विजयी

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ औंध बोपोडी मतदार संघात...

गुलालात नहाले पुण्याचे कारभारी …. पहा विजयी उमेदवारांची यादी

पुणे- येथील महा पालिकेत सत्ता मिळवण्यासाठी 83 जागांची आवश्यकता...

आजच्या विजयाच्या दिवशी गिरीश बापटांची आठवण येते – गणेश बिडकर

पुणे- भाजप नेते गणेश बिडकर यांनी तब्बल 9234 मतांच्या...