आजपर्यंत एकापेक्षा एक कलाकृती साकारल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे *रंगीला रायबा* हा एक नवा चित्रपट घेऊन येत आहेत.
नुकतेच दिवाळीच्या शुभमुहूर्तावर *रंगीला रायबा* चे कलरफुल पोस्टर सोशल मिडिया वर प्रसिद्ध करण्यात आले. Atitude is everything अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट आहे.
दक्षिणेतील चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट वितरक विजय बाबू डी. यांची श्री. विजय साई प्रॉडक्शन ही संस्था आणि या पोस्टरमध्ये दिसणारे फ्रेश चेहरे आल्हाद आणि राधिका हे *रंगीला रायबा* या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत.
रंगतदार पोस्टर आणि हटके नाव यामुळे *रंगीला रायबा* सोशल मिडिया वर viral झाला आहे.
केदार शिंदे दिग्दर्शित रंगीला रायबा ची कथा त्रिनधा राव यांनी तर पटकथा चिन्मय कुलकर्णी यांची आहे तसेच चिन्मय कुलकर्णी सोबत चेतन डांगे यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत, छायालेखन सुरेश देशमाने तर संकलन मनिष मिस्त्री यांनी केले आहे. संगीत पंकज पडघन आणि निषाद तर पार्श्वसंगीत शेखर चंद्रा यांचे आहे. कार्यकारी निर्माता सुरेश शिंदे आहेत.
कलरफुल दिवाळीत प्रदर्शित झालेल्या कलरफुल पोस्टर वरचा हा *रंगीला रायबा* १० नोव्हेंबर पासून येत आहे.