विठ्ठलनामात रंगला ‘रंग पांडुरंग’ हा अभंग, भक्तीगीतांचा कार्यक्रम

Date:

पं. रघुनाथ पणशीकर, आनंद भाटे, चारुदत्त आफळे, मंजुषा पाटील, किशोर कौशल आणि ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या गायनाने पुणेकर मंत्रमुग्ध

पुणे –आषाढी वारीमुळे सर्वत्र भक्तीमय  वातावरण निर्माण झाले आहे, याच भक्तीमय वातावरणात दिग्गज गायकांनी विठूनामाचा गजर करत ‘रंग पांडुरंग’ या अभंग, भाक्तीगीताच्या कार्यक्रमात रसिकांना मंत्रमुग्ध केले,  निमित्त होते संगीतकार प्रसाद जोशी यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘रंग पांडूरंग’ या विशेष कार्यक्रमाचे.

इ.एम.एस. सभागृह बाल शिक्षण मंदिर, कोथरूड पुणे येथे आयोजित ‘रंग पांडुरंग’ या कार्यक्रमात ध्वनिफितीतील अभंग, भक्तिगीते सादर करण्यात आली. या प्रसंगी ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. रघुनाथ पणशीकर, आनंद भाटे, चारुदत्त आफळे, मंजुषा पाटील, किशोर कौशल आणि ज्ञानेश्वर मेश्राम यांनी आपल्या सुमधुर गायनाने रसिकांना भक्तीरसात मंत्रमुग्ध केले. यावेळी संगीत दिग्दर्शक प्रसाद जोशी, कवी मकरंद वळे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला जेष्ठ गायक, पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे शिष्य किशोर कौशल यांच्या ‘अधीर अधीर मन’ या भक्तीगीताने झाली. त्यानंतर पं. रघुनंदन पळशीकर यांनी ‘एकच ध्यास लागे ‘ हा अभंग सादर केला, ज्ञानेश्वर मेश्राम यांनी ‘पांडुरंग भेटायला वारकरी हा चालला’ आणि मंजुषा पाटील यांनी ‘तुझ्या भेटी लागी जीव होई कासावीस’  ही भक्तिगीते सादर केली. सुश्राव्य संगीत आणि भक्तिमय वातावरणाने सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. तसेच या प्रसंगी  ‘रंग पांडुरंग’ या ध्वनिफितीचेही प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आनंद भाटे यांनी ‘वैष्णवांचे माहेर’ ही रचना सादर करत रसिकांची मने जिंकली, तर  मंजुषा पाटील यांनी ‘नको नको कान्हा’ ही गवळण सादर करत आपल्या गायकीने उपस्थितांना मोहित केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी ‘अवघा रंग झाला रंग पांडुरंग’ ही पांडुरंगाची आरती सादर करून केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...