पुणे- पत्रकारिता शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवितास भाजयुमोच्या पदाधिकाऱ्याकडून धोका … असल्याबाबत ची तक्रार एका अर्जाद्वारे फर्ग्युसन रस्त्यावरील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या विद्यार्थ्यांनी डेक्कन पोलिसांकडे केली आहे
कन्हैया कुमारला पुण्यात आणले तर आम्ही ठोकून काढू, आमचा विरोध राहील. ज्यांना त्याचे विचार ऐकायचे आहेत, त्यांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च आम्ही करतो, त्यांनी दिल्लीला जावे अशी धमकी भारतीय जनता युवा मार्चाचे पदाधिकारी ओंकार कदम यांनी रानडे पत्रकारिता संस्थेच्या विद्यार्थ्यांनी दिली आहे.
बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी ओंकार कदम हे फर्ग्युसन रस्त्यावरील विद्यापीठाच्या रानडे पत्रकारिता संस्थेच्या आवारात काही कार्यकर्त्यांसह आले होते. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना कॅन्टीन परिसरात बोलताना त्यांनी धमकी दिली. संविधानिक तत्वाआधारे व निष्पक्ष पत्रकारितेसाठी सर्चच राजकीय विचार समजून घेण्याची आवश्यकता रानडेच्या विद्यार्थ्यांना वाटते. भाजयुमोचे कदम यांनी असंविधानिक रीतीने रानडे पत्रकारिता संस्थेच्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या आवारातच धमकावले आहे. आम्हाला आमच्या जीविताची काळजी वाटते असे विद्यार्थ्यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे.
तक्रार अर्जाची एक प्रत विद्यार्थ्यांनी पोलीस आयुक्त व महासंचालक के.के. पाठक आणि गृह राज्यमंत्री राम शिंदे यांच्याकडे पाठविली आहे. दरम्यान, डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रवीण चौगुले यांना रानडेच्या विद्यार्थ्यांकडून देण्यात आलेल्या तक्रार अर्जाबाबत याप्रकरणी अदखलपात्र गुन्हयाची नोंद करण्यात आली असून भाजयुमोचे पदाधिकारी ओंकार कदम यांच्याकडे चौकशी करण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले.
पत्रकारिता शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवितास भाजयुमोच्या पदाधिकाऱ्याकडून धोका …
Date:


