पुणे
देशाची एकात्मता , अखंडता अबाधित ठेवण्याबरोबरच सुरक्षिततेसाठी सर्वांनी सजगता बाळगणे अत्यावश्यक असून देशाच्या स्वाभिमानाप्रती नव्या पिढीमध्ये भावना जागृत करण्याची नितांत गरज आहे असे प्रतिपादन माजी उपमहापौर आबा बागुल यांनी येथे केले.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राजीव गांधी ई -लर्निग स्कुलमध्ये विद्यार्थ्यांनी रॅली काढली त्याप्रसंगी आबा बागुल बोलत होते. यावेळी भारत माता की जयच्या घोषणांनी विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला. विविधरंगी पोशाख परिधान करून आलेल्या मुला -मुलींनी समानतेसह एकात्मतेचा गजर करताना लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरणही यावेळी केले.याप्रसंगी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल यांच्यासह प्राचार्य , शिक्षक वर्ग उपस्थित होते. यावेळी आबा बागुल म्हणाले, लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाने हे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे, ते कसे मिळाले याची माहिती नव्या पिढीला सतत देऊन देशाच्या स्वाभिमानाप्रति त्यांची भावना जागृत करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, सर्वांचा सन्मान , महिलावर्गाचा आदर आणि देश आधी ,बाकी सारे नंतर याची जाणीव म्हणजे स्वातंत्र्य आहे.देशाची एकात्मता अबाधित ठेवण्याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. अतिरेक्यांचे वाढते हल्ले परतवून लावण्यासाठी सर्वांनी सजगता बाळगली पाहिजे आणि जे देशविरोधी भावना पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांचे मनपरिवर्तन करण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे.त्यानुसार जनजागृती किंवा कृती कार्यक्रम सतत राबविण्याची काळाची गरज आहे. भारत देश महासत्ता बनला आहे त्यामुळे आपण अधिक सजग बनले पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
स्वातंत्र्यदिनी एकात्मता रॅली; जवानांचाही सहभाग
स्वातंत्र्यदिनी दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता राजीव गांधी ई -लर्निंग स्कुल येथून एकात्मता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. देशाची एकात्मता , स्वाभिमानासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले असून त्यात श्रीनगर येथे पायाला गोळी लागूनही आपल्या वीस जवानांना वाचविण्यासाठी सहा अतिरेक्यांना यमसदनी धाडणारे मेजर निखिल घोरपडे हेही काही जवानांसमवेत सहभागी होणार आहेत. असे अमित बागुल यांनी सांगितले.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राजीव गांधी ई -लर्निग स्कुलमध्ये विद्यार्थ्यांनी काढली रॅली
Date: