राज्य सरकारला अल्टिमेटम
ठाणे – ज्या भाेंग्यांमुळे त्रास होत असेल , तो खाली उतरवलाच पाहिजे. आम्ही आमची भूमिका बदलणार नाही , सण असतील तर तेव्हा भोंगे लाऊडस्पीकर असू द्या मात्र 365 दिवस त्यांचा त्रास का ? भोंगे लावून अजान म्हणायची काय गरज आहे, असे मी आज नाही 2018 पासून म्हणत आहे, अजित पवारांना हे कदाचित आठवत नसेल, धर्म आपल्या घरात ठेवायला हवा. प्रार्थना आपली आहे, ती आपल्यापर्यंत ठेवायला हवी आम्हांला का ऐकवता. असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे. जर तुम्हाला हे समजले नाही, तर आम्हाला चालिसा लावावी लागेल असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. या भोंग्यांचा सर्व देशाला होत आहे, ३ मे पर्यंत हे भोंगे उतरवा नाही तर .. त्यासमोर हनुमान चालीसा लावूच असा इशारा आज ठाण्यात झालेल्या उत्तरसभेतून राज ठाकरेंनी दिला आहे. भोंग्यासाठी काही केसेस अंगावर घ्याव्या लागल्या तर घेईल अगोदरच्या शे सव्वाशे केसेस आहेतच ,पण आता हनुमान चालीसा लावेन म्हणतोय , पण मझ्या भात्यातला पुढचा बाण मला काढायला लावू नका , स्वतःहून सर्वांनी आपापले असे भोंगे काढून घ्यावेत असे ते म्हणाले .. 3 तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे की, कुठलीही तेढ, दंगल निर्माण करायची नाहीये. आम्हाला त्याची इच्छादेखील नाही. त्यामुळे १२ एप्रिल ते ३ मे, महाराष्ट्रातल्या सगळ्या मशिदींमधल्या मौलवींशी राज्य सरकारने चर्चा करावी आणि त्यांना सगळे भोंगे खाली उतरवण्यास सांगावे असे ते म्हणाले.
१८ जुलै २००५ चा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल”
“१८ जुलै २००५ चा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे की इतरांची शांतता बिघडवून तुम्ही तुमची प्रार्थना करा किंवा मोठे ध्वनीक्षेप किंवा मोठी वाद्य वाजवून प्रार्थना करा असं कोणताही धर्म सांगत नाही. आमच्यामते समाजात धर्माच्या नावाने म्हातारी माणसं, आजारी रुग्ण, विद्यार्थी यांची पहाटेची झोप बिघडवणं, दिवस खराब करणं आणि बाकीच्यांचा दिनक्रम विस्कळीत करणं अशा गोष्टींना मुळीच परवानगी देता कामा नये,” असंही राज ठाकरे यांनी नमूद केलं.
“.तर संपूर्ण देशात जिथं नमाज लागेल तिथं हनुमान चालिसा लागलाच पाहिजे”
“सर्वोच्च न्यायालयाने ही गोष्ट सांगितली असेल तर राज्यातील गृहखात्याला त्याची अंमलबजावणी करायला काय अडचण आहे? हे होत का नाही? ३ मेपर्यंत भोंगे उतरले नाही, तर संपूर्ण देशात जिथं नमाज लागेल तिथं हनुमान चालिसा लागलाच पाहिजे असं मी सर्व हिंदूना सांगतो,” असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.
चांगले पत्रकार हे भामट्या पत्रकारांमुळे मागे पडले
राज ठाकरे म्हणाले, “गुढीपाडव्याची सभा झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जे तारे तोडले त्यानंतर त्याचं उत्तर दिलं पाहिजे असं वाटलं. पण मला पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यायचं नव्हतं. मी पत्रकार परिषद घेतली असती, तर या पक्षांना बांधिल असलेल्या पत्रकारांनी विषय भरकटवला असता. म्हणून मी ठाण्यात सभा घेण्याचा निर्णय घेतला.””राजकीय पक्षांशी संबधित असलेल्या पत्रकारांनी कंडू शमवून घेतला. अनेक चांगले पत्रकार हे भामट्या पत्रकारांमुळे मागे पडले आहेत. टीका करायची तर काय इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांचे बोलणे हे खरडवायचं,” असं म्हणत राज ठाकरेंनी पत्रकारांवरही टीका केली.
ठाकरेंच्या भाषणातील अन्य मुद्दे–
संजय राऊत शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे हेच कळत नाही
संजय राऊत शिवसेनेचे आहेत की, राष्ट्रवादीचे हेच कळत नाही असे म्हणत आपल्याला ईडीची पुन्हा नोटीस आली तर, सामोरं जाईन, असे त्यांनी यावेळी सांगितले.देशामध्ये अनेक वर्षांपासून जाती आहेत. मात्र, 1999 ला ज्यावेळी राष्ट्रवादीचा जन्म झाल्यानंतर दुसऱ्या जातींबद्दल द्वेष निर्माण करायला लावल्याचे राज यांनी सांगितले. संभाजी ब्रिग्रेडसारख्या संघटना यांनीच तयार केल्या असे म्हणत राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच राज्यात जातीयवाद वाढल्याचा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला. शरद पवार कधीही शिवजी महाराजांचं नाव घेत नाहीत ते भाषण करताना नेहमी तेव्हा शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेतात. शरद पवार स्वत: नास्तिक आहेत. त्यामुळे धर्माकडे बघताना ते नास्तिकतेनं बघतात. ते धर्म, देव वगैरे काही मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीने राजकारण समजावण्याचा प्रयत्न करतात.
अजित पवारांसाठी खास तीन व्हिडिओ
सभेतील भाषणादरम्यान, राज ठाकरेंनी त्यांच्या स्वतःच्या विधानांचे तीन व्हिडिओ खास अजित पवारांसाठी लावले यामध्ये त्यांनी मशिंदींवरील भोग्यांबाबत भूमिका मांडली होती. यावेळी राज ठाकरे यांनी 28 जुलै 2018, 1 ऑगस्ट 2018, 23 जानेवारी 2020 मधील राज ठाकरें यांनी भोंग्याबाबत त्यांची भूमिका मांडली होती.
भुजबळांवर हल्लाबोल
भाषणादरम्यान, राज ठाकरे यांनी छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, त्यांच्या संस्थेतल्या गैरव्यवहारामुळे भुजबळांना जेलमध्ये जावे लागले. दोन अडीच वर्षे जेलमध्ये गेल्यानंतर शपथ घेणारा पहिला नेते भुजबळ होते.
मनसे विझलेला नाही समोरच्याला विझवत जाणार पक्ष
मनसे हा विझलेला पक्ष असल्याचे जयंत पाटील म्हणतात. मात्र, मला त्यांना सांगायचे आहे की, जंतराव मनसे हा विझलेला पक्ष नाही, हा समोरच्याला विझवत जाणारा पक्ष आहे. यावेळी राज ठाकरे यांनी जयंत पाटलांचा उल्लेख ‘जंत’ पाटील असा केला.
देशात समान नागरी कायदा आणा
भाषणादरम्यान राज ठाकरे यांनी आपण देशात समान नागरी कायदा आणण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले की, देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल, असा कायदा आणा असे आवाहन नरेंद्र मोदींना केले आहे. लोकसंख्येवर नियंत्रण आणले पाहिजे असे ते म्हणाले.
अजित पवारांच्या घरी रेड पडली मात्र, सुप्रिया सुळेंच्या नाही
राज ठाकरे म्हणाले की, अजित पवारांच्या घरी रेड पडली, पण सुप्रिया सुळेंच्या घरी नाही. अजित पवारांच्या सख्ख्या बहिणींच्या घरी रेड होते. एकाच घरात राहून रेड टाळणं सुप्रिया सुळेंना कंस जमलं? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मोदींसारखा पंतप्रधान या देशाला मिळावा, असे म्हणणारा पहिला माणूस मी होतो.
पंतप्रधान मोदींवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मोदींसारखा पंतप्रधान या देशाला मिळावा, असे म्हणणारा पहिला माणूस मी होतो. त्यानंतर बाकीचे बोलले असे राज यांनी सांगितले.
मोदींना अभिनंदन करणारे ट्वीट माझे होते
ईडीच्या नोटीसीनंतर ट्रॅक बदलाला असे अनेकांनी म्हटले, मात्र, मला ट्रॅक बदलावा लागत नाही. कास्मीरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर मोदींचे अभिनंदन करणारे ट्वीट माझे होते असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
“माझा ताफा कुणीतरी अडवणार आहे, हे इंटेलिजन्स कळलं, पण.”
माझ्या सभेपूर्वी पोलिसांचा आपल्याला फोन आला त्यावेळी त्यांनी माझा ताफा काही छोट्या संघटना अडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर उत्तर देताना माझा ताफा अडवणार हे पोलिसांना कळलं मात्र, पवारांच्या घरी एसटी कर्मचारी जाणार हे पोलिसांना कळलं नाही का ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थीत केला. गुढीपाडव्याची सभा झाल्यानंतर अनेकांनी तारे तोडल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे.