“इंटरनॅशनल ह्युमन राईट्स असोसिएशन’च्या उत्तर विभाग अध्यक्षपदी राज मुछाल यांची नियुक्ती
पुणे :
“लायन्स क्लब इंटरनॅशनल’चे माजी प्रांतपाल राज मुछाल यांची “इंटरनॅशनल ह्युमन राईट्स असोसिएशन’च्या राष्ट्रीय उत्तर विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
असोसिएशनचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. प्रशांत यांनी राज मुछाल यांनी नियुक्तीचे पत्र दिले. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी आहे.
“इंटरनॅशनल ह्युमन राईट्स असोसिएशन’ ही भारत सरकारच्या मानवाधिकार रक्षणाच्या धोरणानुसार स्थापित संस्था असून, मानवाधिकार जागृती आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे.
राज मुछाल यांनी लायन्सचे प्रांतपाल म्हणून प्रभावी कामगिरी बजावली असून, “निर्मल कात्रज’ शून्य कचरा प्रकल्प, नेत्ररुग्णांवर शस्त्रक्रिया, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, डायलिसिस यंत्र वितरण, अशा अनेक सामाजिक प्रकल्पात त्यांनी योगदान दिले आहे.