पुण्यातील पेट्रोल माफियांच्या अड्ड्यावर छापा ; 80 लाखांचा ऐवज जप्त; मालकासह 7 जण गजाआड

Date:

पेट्रोल चोरी, पेट्रोल भेसळ आणि अशा पेट्रोलची विक्री करणारी टोळी …

पुणे-कदमवाकस्ती हद्दीतील पेट्रोलजन्य पदार्थ चोरीच्या अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी दोन टँकरसह 80 लाखांचा ऐवज जप्त केला आहे. यामध्ये अड्ड्याच्या मालकासह सात जणांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.या कारवाईत धिरज विठ्ठल काळभोर (वय 36, रा. कदमवाकवस्ती ता हवेली), अमिर मलिक शेख (वय 32, रा. कदमवाकवस्ती, मुळ गाव मु. पो पिंपळे (आर) ता. बार्शी जि सोलापुर), सचिन भाऊराव सुरवसे (वय 30, रा. सिद्राममळा, लोणीकाळभोर. मुळ रा. भाळवणी, जेऊर, ता करमाळा), विजय मारुती जगताप (वय 52, अंबरनाथ मंदीराजवळ, लोणी काळभोर.), रामचंद्र रावसाहेब देवकाते (वय 41, रा. संभाजी नगर, कदमवाकवस्ती), धिरज विठ्ठल काळभोर (वय 36, रा. कदमवाकवस्ती), इसाक इस्माइल मजकुरी (वय 42, रा. संभाजी नगर ताराहाइट्स बी 404, कदमवाकवस्ती) यांचेसमवेत इंधन चोरीसाठी जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल महेश बबन काळभोर (वय 42, रा. कदमवाकवस्ती) यांना पोलिसांनी अटक केली आ. पोलिस शिपाई बाजीराव वीर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत भारत टायर्स या दुकानाच्या पाठीमागे दोन टॅकरमधुन पाच ते सहा जण टॅंकरमधुन इंधन काढत असल्याची माहिती चव्हाण यांना मिळाली होती. याची खातरजमा करण्यासाठी वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे व सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित गोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना धिरज काळभोर व त्याचे सहकारी इंडीयन ऑईल कंपणीच्या दोन टॅंकरमधुन चोरुन तसेच धोकादायक पध्दतीने पेट्रोल व डिझेल काढत असल्याचे आढळुन आले. यावेळी सदर ठिकाणी पोलीसांना इंधनाने भरलेले दोन टँकर क्रमांक एमएच 12 आरएन 4699 व एमएच 12 आरएन 5451 यासह, 7 मोबाईल फोन, लोखंडी सळई, चोरलेले इंधन असा 79 लाख 51 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

तीन महिन्यापुर्वी तरडे ग्रामपंचायत हद्दीत पुणे शहर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी इंधन चोरी करणाऱ्यांवर छापा टाकून सुमारे 20 पेक्षा जास्त टॅकरवर कारवाई केली होती. याचा धुरळा खाली बसण्यापुर्वीच लोणी काळभोरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी कदमवाकस्ती हद्दीत कारवाई केल्याने पेट्रोल माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. याठिकाणी पोलिस पथक पोहचण्यापुर्वीच कारवाई होऊ नये म्हणून दबाव टाकण्यात आला परंतू वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दबाव झुगारून कारवाई पुर्ण केली. या कारवाईत इंधन माफियाबरोबरच, इंधन अड्ड्यासाठी जागा देणाऱ्या जागा मालकावर ही कारवाई करण्यात आली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...