Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

आम्ही दोघी

Date:

ब-याचदा  प्रवासात आपली अनेक व्यक्तींची अजाणता ओळख होते. निदान माझ्या बाबतीत तरी होतं. मग कधी-कधी फक्त स्माईल तर कधी-कधी इकडच्या तिकडच्या गप्पा. त्यात वेळ कसा निघून  जातो  ते ही कळत नाही.. असाच एक किस्सा खास स्मरणात राहिलेला…  कुठेही प्रवासाला गेले नव्हते तर नाटक बघायला गेले होते  आणि ते ही एकटीच गेले होते … ‘‘आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे डी रो मधली दुसरी सीट होती. पहिल्या सीट वर कोण असेल .. उगाचच कुतुहल होतं… जेंटस असेल की लेडीज… मी जशी एकटी .. तसं तो किंवा ती पण एकटीच असणार… सारखं आपलं बाई डोअरकडे लक्ष जास्त होतं… पण एकदाची माझी प्रतीक्षा संपली आणि एक बाई माझ्या बाजूला येऊन बसली…. हुश्श…. झालं…. एकदाच…. तसं म्हणा मला काही फरक पडत नव्हता… पण जेंटस् असता बाजूला तर अवघडून बसावं लागलं असतं…

नाटक चालू व्हायला तसा 5-10 मिनिटं अवधी होता. बसल्या-बसल्या त्या बाईंनी मला छानसं स्माईल दिलं. मी ही त्यांना मस्त स्माईल दिलं. 4.40 झाले तरी नाटक सुरु होईना… त्या बाईंनीच बोलायला सुरुवात केली.. हल्ली नाटक काही वेळेवर सुरु करत नाही. 10-15 मिनिटं उशीरच करतात. आपण मेलं  घरचं सगळं आवरुन धावत पळत यायचं आणि हे कुठे वेळेवर सुरुच करत नाही हो. मागल्या वेळेस पण असंच झालं’’… मी पण त्यांच्या बोलण्याला हो ला हो केलं.. तसं नाही हो खाली अजून करंट बुकींग चालू असेल म्हणून 10-15 मिनिटं उशीर झाला असेल. हल्ली मराठी नाटकांचा प्रेक्षक वर्ग तसा कमीच झालाय. हल्लीची पिढी कुठं नाटक बघते. माझ्या  या बोलण्याची तिने री ला री ओढली. ‘‘खरंय तसं तुमचं म्हणणं. पण घरुन झालेले संस्कारही महत्त्वाचे असतात हो. माझ्या दोन्ही सुना कॉनव्हेंटमध्ये शिकलेल्या पण मराठी नाटक आणि सिनेमाची आवड आहे.  लग्नात त्यांनी तशी अटच घातली होती मुळी आम्हाला.  आमच्या आवडी निवडी जपणारा मुलगा हवा.’’ मी म्हटलं‘‘वा खूप छान.’’

मग बाईंनी मस्त गप्पा मारायलाच सुरुवात केली.. ‘‘काल पण मला नाटक बघायचं होतं हो. पण नेमकं हाऊस फुल्ल, मग आजच्या नाटकाची तिकीट काढली. तसं हे नाटकही मला बघायचं  होतं  हो.  मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला लागली..

बोलता-बोलता मला कळलं की तिला 2 मुलं आहेत. दोन्ही मुलं इंजिनियर आहेत. त्यातील धाकटा मुलगा- सून  अमेरिकेला असतात. सून कथ्थक शिकली आहे तर मुलगाही पूर्वी तबला वाजवायचा…. तेवढ्यात नाटक सुरु झालं.. आणि आमच्या गप्पाही थांबल्या.

नाटकात फक्त दोनच पात्र.. प्रतिक्षा लोणकर आणि ऐश्‍वर्या नारकर.. एका वेगळ्या चाकोरी बाहेरच्या विषयावरचं  नाटक.. दोघींची अप्रतिम अभिनय आणि संवादांची जुगलबंदी… नाटक ऐन रंगात आलं असतांनाच  नेहमीप्रमाणे मध्यांतर झालं.. आणि माझ्या बाजूला बसलेल्या बाईंच्या गप्पा सुरु झाल्या..

बोलताना माझा मुलगाही तबला शिकतो आहे हे मी त्यांना सांगितलं. मग त्यांनी मला माझं आडनाव विचारलं…मी नार्वेकर सांगितलं .. पण पुढची प्रश्‍नावली गावं कुठचं… तेही सांगून झालं… पण तरी त्या बाईंना नक्की काय विचारायचं होतं  ते कळत नव्हतं… मग एकदाच माहेरचं नावही विचारून झालं.. मी पाटील सांगितलं … त्यावर माहेरचं गाव कुठलं… ते ही सांगून झालं… मग तुमचं इंटरकास्ट मॅरेज आहे का हेही विचारून झालं… मग कुठे तरी मला त्यांच्या प्रश्‍नाचा रोख कळायला लागला .. मग मीच सांगून टाकलं मी माहेरुन ब्राह्मण तर सासरवरुन भंडारी आहे… तेव्हा कुठं त्या बाईच्या मनातला गोंधळ थोडा कमी झाला.. मला म्हणाल्या,  तुम्ही म्हणालात मुलगा तबला शिकतो… क्लासिकलची पण आवड आहे.. आणि तुमच्या बोलण्यावरुन पण तुम्ही ब्राह्मण असाव्यात असं वाटत होतं पण विचारणार कसं ना डायरेक्ट?

मला या त्यांच्या बोलण्याचं  हसू आलं. खरं तर.. मग त्या स्वतः बद्दल सांगत होत्या.. आज त्या नाटकाला एकट्या का आल्या. त्यांचे मिस्टर काय करतात… मुलं- सुना काय करतात… त्या शिक्षिका होत्या… आणि बरचं काही.

मी शांतपणे त्यांचं  बोलणं ऐकतही होते आणि अधून-मधून  मान डोलवतही होते… मजा वाटली मला पण… खरचं एवढ्या थोडयाशा वेळात किती गप्पा मारल्या आम्ही. मध्‍यांतर  संपल्याची घंटा वाजली आणि आमच्या गप्पा संपल्या… ऐश्‍वर्या आणि प्रतिक्षाची अभिनयाची  जुगलबंदी पुन्हा सुरु झाली…

दोन तासाने नाटक संपलं… आम्ही अनोळख्या दोघी.. आपापली वाट धरुन चालू लागलो….

पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग,

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.),

मुंबई – 400068

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भविष्याची भक्कम पायाभरणी: १,४५० तरुण मुलींना भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी एलपीएफ शिष्यवृत्ती मिळाली

पुणे, : “शिक्षणाचा उद्देश आरशांचे खिडक्यांमध्ये आणि खिडक्यांचे दरवाजांमध्ये...

भारतातील लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत..अनंत गाडगीळ

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी...