Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

व्‍यंगचित्रकलेचा वारसा जपणारे दिवाकर शेडगे

Date:

व्‍यंगचित्रकार  दिवाकर शेडगे यांनी कलाक्षेत्रामध्‍ये स्‍वत:चा एक वेगळा ठसा उमटवला आहे.  कलेचा वारसा असलेल्‍या घराण्‍यामध्‍ये 7 फेब्रुवारी 1942 मध्‍ये त्‍यांचा जन्‍म झाला. त्‍यांचे शिक्षण लौकिकार्थाने एस.एस.सी. असले तरी चित्रकलेच्‍या क्षेत्रात ते ‘मास्‍टर’ आहेत.  त्‍यांची व्‍यंगचित्रातील रेषा रसिकांच्‍या ओळखीची झाली आहे. स्‍वतंत्र शैली असलेले त्‍यांचे व्‍यंगचित्र पाहिल्‍यावर वाचकांच्‍या चेह-यावर खुदकन हसू आल्‍याशिवाय राहत नाही.  उपलब्‍ध जागेचा परिपूर्ण वापर हे त्‍यांच्‍या व्‍यंगचित्राचे आणखी एक ठळक वैशिष्‍ट्य म्‍हणावे लागेल.

आपल्‍या व्‍यंगचित्रकलेच्‍या प्रवासाविषयी  शेडगे सांगतात. माझं पूर्ण नाव दिवाकर जयंत शेडगे.  आमचं सारं  घराणं आर्टीस्टचं.  माझे वडील स्वत: चित्रकार होते. माझा भाऊ कमल शेडगे हा कॅलिग्राफीमध्ये मास्टर. सर्वात धाकटा भाऊही पण तो आता हयात नाहीय, तोही चित्रकार होता. आम्ही चौघंही टाइम्स मध्ये कामाला होतो.  ह्या अशा कलाकार घराण्यात मी ब्रश, पेन्सिल घेतल्याशिवाय काय करणार होतो. अभ्यासात मी तितका हुशार नव्हतो त्‍यामुळे एस.एस. सी. झाल्यावर मी कॉलेजला न जाता वडिलांच्या हाताखाली  काम करु लागलो.

मी चित्र काढता-काढता व्यंगचित्राकडे केव्हा वळालो हे मला समजलंच नाही. मारिओ मिरांडा, बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या चित्रांनं मी अक्षरश: भारावून गेलो. पूर्वी टाइम्सच्‍या ‘फिल्मफेअर’मध्ये त्यांचे पूर्णपान भरुन रंगीत चित्र यायचं. चित्रांचे फिनिशींग, चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स जबरदस्त. तसंच बाळासाहेबांची ‘मार्मिक’मध्ये येणारी व्‍यंगचित्रे खूप आवडायची. त्‍यांच्‍या व्‍यंगचित्रांनी मला अक्षरश: वेडच लावलं, असं म्‍हटल्‍यास वावगं ठरु नये.

ह्या दोघांसारखीच व्यंगचित्रे काढायची असं मी  ठरवलं.  सुरुवातीचे काही दिवस काहीचं जमलं नाही. पेपर्सवर पेपर फाडले. पण मी हार मानली नाही. मनाशी जिद्द धरली, वडिलांनी मार्गदर्शन केलं. मग एकदा हात बसल्यावर मी थांबलो नाही.  1969च्‍या ‘आवाज’ या दिवाळी अंकामध्‍ये माझं व्‍यंगचित्र पहिल्‍यांदा प्रसिध्‍द झालं. माझ्याच स्‍वतंत्र शैलीमधील हे व्‍यंगचित्र असल्‍याने मला हुरुप आला.  त्यानंतर लोकसत्ता, श्रीदीपलक्ष्मी, दीपावली, हेमांगी, श्री, आक्रोश, दक्षता, जत्रा, सुगंध, लोकप्रभा, मार्मिक, गंधाली, फीरकी व इतर अनेक दिवाळी अंकात माझ्या मालिका प्रसिध्द झाल्या. मी  जवळ-जवळ पन्नासहून अधिक दिवाळी अंकांसाठी व्यंगचित्रे काढली आहेत, अजूनही काढतोय. आतापर्यंत माझी  सुमारे 4 हजार  व्यंगचित्रे प्रसिध्द झाली आहेत. याशिवाय मी  काही नाटकांच्या जाहिरातीही  केल्या. ‘ऑल दी बेस्ट’च्या पंधरा जाहिराती केल्या. मोहन वाघांनी खूष होवून मला ट्रॉफी दिली. सन  1992 मध्‍ये मुंबई मराठी पत्रकार संघाचं ‘मधुचंद्र साहित्यिकांचा’ या मालिकेतील प्रसिध्‍द झालेल्‍या हास्‍यचित्रांबद्दल उत्कृष्ट हास्यचित्राचं शं.वा. किर्लोस्कर स्मृतिचिन्ह मिळालं. सन 2002 मध्‍ये ‘कलाकुंज’ दिवाळी अंकांसाठी  उत्कृष्ट हास्यचित्रांच शं.वा. किर्लोस्कर स्मृतिचिन्ह मिळालं.  व्‍यंगचित्रकार म्‍हणून रत्नागिरी टाइम्‍स, दो बजे दोपहर, सांज समाचार (हिन्दी) यांच्यासाठी वर्षभर कार्टून स्ट्रिप्स केल्या. काही दिवाळी अंकांची मृखपृष्ठ व कथाचित्रे सुध्दा मी केलीत. मी माझे स्वत:चे व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरवले नाही. पण प्रदर्शनात मी चित्रे पाठवतो.  आज माझं वय 78 वर्षे आहे. अजूनही काम करतोय. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत  मी काम करणार आहे,  थांबणार नाही… ॲट ॲनी कॉस्ट.

पत्ता- दिवाकर शेडगे, 104/शिवआशिष को.ऑ.हा.सो., जुनी पोस्ट ऑफीस बिल्डिंग, जुना ठाणे-बेलापूर रोड, कळवा (पश्चिम), पिनकोड – 400605,  दूरध्‍वनी  -(022)  25412309, मो.  9821291029

 

राजेंद्र सरग, 9423245456

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा...

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...