ती संध्याकाळ…

Date:

 

नेहमीप्रमाणे आजही अंजली संध्याकाळची राऊंड मारायला म्हणून बाहेर पडली. तशी अंजलीची ती रोजची
सवय एक-दोन राऊंड्स मारायचे आणि मग थोडावेळ बेंचवर बसून आराम करायचा, मोकळा श्‍वास घ्यायचा,
दिवसभराचा शीण घालवायचा आणि मग घरी जायचं.
नेहमीचे ओळखीचे चेहरे दिसले की बरंही वाटतं, मग इकडच्या तिकडच्या गप्पा असतात. त्या संध्याकाळीही
अशीच गप्पा मारत असताना, सहज समोर नजर गेली, एक साधारण पन्नाशीच्या आसपास असेलली स्त्री
व्हीलचेअरवर बसून होती, आणि समोर सायकल चालवणा-या एका छोट्या मुलाबरोबर बोलण्यात गुंग होती.
अंजलीला त्यांच्याकडे पाहून उत्सुकता वाटू लागली. गप्पांकडे तिचे लक्ष नव्हतेच सगळे लक्ष त्या वयस्कर बाई
व मुलाकडे होते. ती बाई त्याला काहीतरी विचारत होती, तोही तिची उत्तरे देत होता. दोघांच्या खूप छान
गप्पा रंगल्या होत्या. अंजलीच्या मनात विचारांच वादळ उठलं, काय बरं ते दोघे बोलत असावे, दोघांच्या
वयातलं अंतर, तीही गाडीवर पण व्हीलचेअरवर, तो मुलगाही दोन चाकीवर पण सायकलवर. तिला बहुदा
आपले बालपण आठवले असेल, त्या गमतीजमती ती त्या मुलाला सांगत असेल, त्याच्या गमतीजमती ऐकत
असेल. दोघांमधला तो भावनिक संवाद चालू होता, त्याला वयाचं बंधन नव्हतं की नात्याच वलयही नव्हतं,
एकमेकांचे सूर छान जमले होते. अंजलीही त्यांच्या चेह-याच्‍या हावभावावरून अंदाज घेऊन खुश होत होती.
थोड्यावेळाने एक वयस्कर माणूस आला आणि त्या व्हीलचेअरवरल्या बाईला फिरायला घेऊन गेला. तो
मुलगाही मागे वळून वळून तिला बघत होता, ती ही मागे वळून वळून त्याला टाटा करत होती. तिचं बालपण
असंच ती मागे वळून त्या छोट्या मुलाच्यात पाहत होती, जे केव्हाच असं मागे सरून गेलं होतं, आज पुन्हा त्या
मुलाच्यात ते तिला दिसलं. तीच्या चेह-यावरचा आनंद काही वेगळाच होता. एक हृदयस्पर्शी प्रसंग होता,
अंजलीही तो लांबून अनुभवत होती. खरंच बालपणीचा काळ तो किती सुखाचा.. परत अनुभवयाला मिळाला
तर….विचार करत करत अंजली घरी आली ती एक अविस्मरणीय संध्याकाळ बरोबर घेऊनच…..

– पुर्णिमा नार्वेकर, दहिसर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...