- 22 यार्डसच्या अमन मुल्लाची शतकी खेळी;
पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत अ गटात पीवायसी हिंदू जिमखाना संघाने अव्वल स्थान पटकावत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर, व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने पहिला विजय नोंदविला. तर, 22 यार्डस अ गटात दुसरे स्थान पटकावत 0.264 नेट सरासरीच्या जोरावर उपांत्य फेरीत धडक मारली.
पीवायसी हिंदू जिमखाना व पूना क्लब मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत अ गटाच्या लढतीत सोहमी शिंदे() श्रेयश वालेकर आणि यश माने यांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 22 यार्डस संघाचा 17 धावांनी पराभव केला. पीवायसी हिंदू जिमखाना नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 45षटकात 7बाद 246धावा केल्या. सलामीची जोडी सोहम शिंदेने 87चेंडूत 6चौकार व 2षटकाराच्या मदतीने 63 धावा व श्रेयश वालेकरने 71 चेंडूत 6चौकारासह 52धावा यांनी 152चेंडूत 121 धावांची भागीदारी करून संघाला भक्कम सुरुवात करून दिली. त्यानंतर हे दोघेही बाद झाल्यावर यश मानेने 64 चेंडूत 5चौकार व 1षटकाराच्या मदतीने 57 धावा चोपल्या. यशला स्वराज चव्हाण नाबाद 19, आदर्श बोथरा 17, अखिलेश गवळी 14 यांनी सुरेख साथ देत संघाला 246 धावांचे आव्हान उभे करून दिले. 22 यार्डसकडून अथर्व शिंदे(1-43), अमन मुल्ला(1-29), दिलीप यादव(1-36), गौरव कुमकर(1-46), तेजस तोलसणकर(1-52) यांनी प्रत्येकी 1गडी बाद केला. याच्या उत्तरात 22 यार्डस संघाने 45षटकात 8बाद 229धावाच करू शकला. यामध्ये अमन मुल्लाने एकाबाजूने लढताना 131 चेंडूत 15 चौकार व 5 षटकाराच्या मदतीने 144 धावांची खेळी केली. अमनला रतन उत्तुरे17, हर्षल हडके 15, नितीश कुकडेजा 14 यांनी धावा काढून साथ दिली. पीवायसीकडून वैभव टीहळे (2-43), अब्दुल अस्लम(2-37), यश खळदकर(2-53)यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. शतकी खेळी करणारा अमन मुल्ला सामनावीर ठरला.
दुसऱ्या सामन्यात रोहित चौधरी(1-27 व नाबाद 59 धावा) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने पूना क्लब संघाचा 6 गडी राखून पराभव केला. व्हेरॉक संघाच्या टिळक जाधव(3-32), सोहम जामले(2-34), आदिराज कदम(2-28), ओमकार राजपूत(2-36)यांनी केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे पूना क्लब संघाचा डाव 44.5षटकात 182 धावावर आटोपला. यात अश्कन काझी 48, अक्षय खोपडे 23, अनिश जगताप 24, कन्हैया लड्डा 20, आर्यन गाडगीळ 19, निश्चय नवले 15 यांनी धावा केल्या. याच्या उत्तरात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने हे आव्हान 41.1षटकात 5बाद 185धावा करून पूर्ण केले. यात सूरज गोंडने 104 चेंडूत 8चौकाराच्या मदतीने नाबाद 76धावा व रोहित चौधरीने 54 चेंडूत 3चौकार व 3 षटकाराच्या मदतीने नाबाद 59 धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी 111चेंडूत 107 धावांची भागीदारी केली. सामन्याचा मानकरी रोहित चौधरी ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: गट साखळी फेरी:गट अ: पीवायसी हिंदू जिमखाना: 45षटकात 7बाद 246धावा(सोहम शिंदे 63(87,6×4,2×6), यश माने 57(64,5×4,1×6), श्रेयश वालेकर 52(71,6×4), स्वराज चव्हाण नाबाद 19, आदर्श बोथरा 17, अखिलेश गवळी 14, अथर्व शिंदे 1-43, अमन मुल्ला 1-29, दिलीप यादव 1-36, गौरव कुमकर 1-46, तेजस तोलसणकर 1-52) वि.वि.22 यार्डस: 45षटकात 8बाद 229धावा(अमन मुल्ला 144(131,15×4, 5×6), रतन उत्तुरे17, हर्षल हडके 15, नितीश कुकडेजा 14, वैभव टीहळे 2-43, अब्दुल अस्लम 2-37, यश खळदकर 2-53); सामनावीर-अमन मुल्ला; पीवायसी संघ 17 धावांनी विजयी;
गट अ: पूना क्लब: 44.5षटकात सर्वबाद 182 धावा(अश्कन काझी 48(44,7×4), अक्षय खोपडे 23(20,3×4,1×6), अनिश जगताप 24(68), कन्हैया लड्डा 20, आर्यन गाडगीळ 19, निश्चय नवले 15, टिळक जाधव 3-32, सोहम जामले 2-34, आदिराज कदम 2-28, ओमकार राजपूत 2-36, रोहित चौधरी 1-27) पराभूत वि.व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 41.1षटकात 5बाद 185धावा(सूरज गोंड नाबाद 76(104,8×4), रोहित चौधरी नाबाद 59(54,3×4,3×6), ओम भाबड 16, अश्कन काझी 2-24, कन्हैया लड्डा 1-39, प्रथमेश गावडे 1-33);सामनावीर-रोहित चौधरी; व्हेरॉक संघ 5 गडी राखून विजयी.

