शनिवारवाडा नृत्य आणि संगीत महोत्सव 10 फेब्रुवारी रोजी

Date:

पुणे-नृत्य आणि संगीत यांचा सुंदर मिलाफ असणारा शनिवारवाडा नृत्य आणि
संगीत महोत्सव यंदा रविवार, दि. 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता
ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. या महोत्सवाचे यंदाचे
18वे वर्ष आहे. यंदाच्या महोत्सवाचे उद्घाटन प्रख्यात अभिनेत्री पद्मनी कोल्हापुरे
करणार आहेत.
या संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संयोजन समिती सदस्य
अभिनेते जॅकी श्रॉफ म्हणाले की, “पुणे ही सांस्कृतिक नगरी आहे. येथे गेली 18 वर्षे
नृत्य महोत्सव होतो ही विशेष बाब आहे. यंदा 7 नृत्य शैलींचा अविष्कार एकाच
मंचावर होत आहे ही अनोखी घटना आहे. मुंबईतही असा कार्यक्रम व्हायला हवा.
रसिकांनी याचा जरूर लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी संयोजन समितीतर्फे बोलताना सबीना संघवी म्हणाल्या की, पुणे हे
महोत्सवांचे शहर आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पुणे आघाडीवर आहे. शास्त्रीय
नृत्याचे शिक्षण देणार्‍या अनेक संस्था येथे आहेत. त्यामुळेच येथे नृत्य महोत्सव
सुरू करण्यात आम्ही पुढाकार घेतला आणि गेली 18 वर्षे हा महोत्सव चालू आहे.
ही आनंदाची बाब आहे.
या प्रसंगी संयोजन समितीच्या गायत्रीदेवी पटवर्धन, वर्षा चोरडीया, मनिषा
साठे तसेच शमा भाटे व स्वाती दैठणकर पत्रकार परिषदेत उपस्थित होत्या.

प्रख्यात अभिनेत्री पद्मनी कोल्हापुरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने महोत्सवाचे
उद्घाटन झाल्यानंतर ज्येष्ठ भरतनाट्यम् नृत्यांगना स्वाती दैठणकर व त्यांच्या
‘नुपूरनाद’ चे 11 शिष्या ‘गणेशवंदना’ सादर करतील. त्यानंतर ‘महाभारत रीइंटरप्रीटेड
– अतित की परछाईयाँ’ या नृत्य व संगीत यांचा सुंदर मिलाफ असणार्‍या 105
मिनिटांच्या नृत्यसंरचनेची सुरूवात होईल. याची संकल्पना व नृत्य दिग्दर्शन
नृत्यगुरू पं. शमा भाटे यांचे आहे. एकून 7 नृत्य शैलींपैकी नाट्यमय ‘कथ्थक’मधून
द्रौपदी – अमीरा पाटणकर, ‘कथकली’तून भीष्म – डॉ. कन्नन, ‘छाऊ’तून आक्रस्ताळा
आणि शीघ्रकोपी दुर्योधन – राकेश साई बाबू, ‘कुचिपुडी’तून सहनशील कुंती –
वैजयंती काशी, ‘मोहिनीअट्टम’ मधून गांधारी – गोपिका वर्मा, ‘ओडिसी’तून धोरणी
युधिष्ठिर – रामली इब्राहिम आणि ‘भरतनाट्यम’मधून कर्ण – वैभव आरेकर या
व्यक्तिरेखा वेशभूषा आणि संगीतासह वैविध्यपूर्ण शैलीतून महाभारताच्या
कथानकाचा पट मांडणार आहेत. ‘नादरूप’ या संस्थेच्या शिष्या मुख्य नृत्य
विशारदांना साथ देणार आहेत.
अतिशय तालबद्ध नृत्य, श्रवणीय संगीत आणि एकरूप झालेल्या भावमुद्रा या
आधारे सादर होणार्‍या या नृत्य व संगीत कार्यक्रमात, यातील भिन्न नृत्यशैलींना
वेगवेगळे संगीत देण्यात आले आहे. नरेंद्र भिडे यांनी संगीतरचना केली आहे.
अनुरूप प्रकाशयोजना हर्षवर्धन पाठक यांनी केली आहे.
मानवी जीवनातील गुंतागुंतीचे, सर्वार्थाने वेध घेणारे महाभारत हे खर्‍या
अर्थाने महाकाव्य आहे. पराकोटीचे दुःख, औदार्य, सूड, सहानुभूती, विफलता आणि
शांतता या सार्‍यांचा अनुभव यामध्ये मिळतो. या नृत्यसंरचनेमध्ये महाभारतातील
काही महत्वाच्या व्यक्तिरेखांना एकत्र गुंफण्यात आले आहे. या व्यक्तीरेखा त्यांच्या
जीवनातील अखेरच्या टप्प्यावर आहेत. त्यांच्या जीवनात प्रचंड मोठी उलथापालथ
झाल्यानंतर आपल्या सर्व प्रिय व्यक्ती आणि संपत्तीचा नाश झाल्यावर ते मागे

वळून पाहत आपल्या जीवनाचे तटस्थपणे परीक्षण करीत आहेत. अचानकपणे
त्यांना तो विजय निष्फळ आणि पराभव निरर्थक वाटू लागतो. “येवढा महाविनाश
होण्यास मी कारणीभूत झाले आहे काय? आणि हा असा महाविनाश टाळता आला
नसता काय?” असाच प्रश्न यातील प्रत्येक व्यक्तीरेखा विचारत राहते. एकाच
कथानकात भिन्न नृत्य शैलींचा एकत्रित अविष्कार मनाला मोहित करतो. या
महोत्सवाच्या प्रवेशिका दि. 5 फेब्रुवारी पासून 9 फेब्रुवारी पर्यंत बालगंधर्व रंगमंदिर,
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि हॉटेल ओ (कोरेगाव पार्क) येथे उपलब्ध
असतील. या प्रवेशिका महोत्सवाच्या दिवशी म्हणजे दि. 10 फेब्रुवारी सकाळी 11
नंतर कार्यक्रमस्थळी उपलब्ध असतील. गोल्ड प्रवेशिकेचे मूल्य 500 रुपये आणि
सिल्वर प्रवेशिकेचे मूल्य 300 रूपये आहे. प्रथम येणार्‍यास प्राधान्य, याप्रमाणे
आसन व्यवस्था करण्यात आली आहे. ‘बूक माय शो’ वेबसाईटवर देखील ऑनलाईन
या प्रवेशिकांचे आरक्षण करता येऊ शकेल.
यंदाच्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक इंडो स्कॉटले अ‍ॅटो पार्टस प्रा.लि. असून
झाला ग्रूप, फाईव्ह एफ वर्ल्ड, वेकफिल्ड, रेडिओ वन आणि प्युअर गोल्ड फाईन
चॉकलेट हे सहप्रायोजक आहेत.
शनिवारवाडा नृत्य व संगीत महोत्सवाची कार्यकारिणी पुढील प्रमाणे – जॅकी
श्रॉफ, सबीना संघवी, गायत्रीदेवी पटवर्धन, मनीषा साठे, वर्षा चोरडिया, नीलम शेेेवलेकर,
पारूल मेहता, रेखा कृष्णन आणि महोत्सव समन्वयक विनेश परदेशी.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पंतप्रधान आवास योजनेतील सव्वाचार कोटीच्या घोटाळ्यावर मुनगुंटीवार आक्रमक

'तारीख पे तारीख' नको, थेट निलंबन करा! सुधीर मुनगंटीवारांचा...

हुंडाविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी व जिल्हास्तरावर विशेष पथके तैनात करा- डॉ. गोऱ्हे

बुलढाणा-बाणेर येथील विवाहितांच्या आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी व कठोर...

१० लाख रुपयांची X रे मशीन ६१ लाखांना खरेदी केली-आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या काळात गैरव्यवहार :मनसे

मुंबई-महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी...

४ वर्षेच का मुंबई महापालिका अर्थकारणाची २५ वर्षाची चौकशी होऊ द्यात -भाजप आमदार अमित साटम

मुंबई मनपा चौकशीवरून भाजप-सपा आमने-सामनेमुंबई- महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विधानसभा...