दोन अक्षराचा शब्द लाभ, अडीच अक्षराचा शब्द भाग्य, तीन अक्षराचा शब्द नशिब, साडेतीन अक्षराचा शब्द किस्मत आहे. त्याला’मेहनत’ या चार अक्षराच्या शब्दाची जोड दिली तर तुमच्या भाग्याचे सर्व दारे खुली होतात असे सांगत मेहनतीचे आणि आपल्याजीवनाचे नाते दृढ असणे आवश्यक आहे, विद्यार्थ्यांनी हाच मंत्र आपल्या जीवनात अंगिकारला तर जीवनात उच्चपदी आपण नक्कीपोहचाल असा संदेश जैन मुनीश्री पुलकसागरजी महाराज यांनी विद्यार्थ्यांना दिला.
आर. एम. धारिवाल फौंडेशनतर्फे ६२४ विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करण्याचा कार्यक्रम पुण्यातील माणिकचंद हाऊस येथेजैन मुनीश्री पुलकसागरजी महाराज यांच्या मंगल सानिध्यात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. आर. एम. धारिवाल फौंडेशनच्याप्रमुख शोभाताई धारिवाल, फौंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल, भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू युसुफ पठाण, प्रणीतसागरजी,महाराज पुनीत बालन यावेळी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुनीश्री पुलकसागरजी महाराज "हसण्याचा हक्क त्यांनाच असतो जे दुसर्याचे अश्रू पुसतात. तुम्ही तुमच्या जीवनात कोणी बना अगरबनू नका परंतु एक चांगला माणूस बना. देवाचा शोध घेत बसू नका. आज चांगल्या आणि खऱ्या माणसांची आवश्यकता आहे. कारणहीच माणसे भविष्यातील देव आहेत.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अनेकजण देतात. मात्र, शोभाताई धारिवाल यांनी केवळ शिष्यवृत्ती नाही तर त्याबरोबरच शाकाहार आणिअहिंसेची, दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊ नका, दुसऱ्याचे जीवन खराब करू नका अशी शिकवण दिली. शिष्यवृत्तीच्या रूपाने तुम्हालाजी मदत झाली आहे त्याची परतफेड जीवनात काहीतरी बनून करा असे आवाहनही मुनीश्री पुलकसागरजी महाराज यांनी यावेळीकेले. तसेच रसिकलाल धारिवाल यांनी मेहनत करून साम्राज्य उभारले त्याचबरोबर समाजातील दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक,वैद्यकीय व धार्मिक मदत करून आदर्श घालून दिला असे ते म्हणाले.
शोभा धारिवाल म्हणाल्या, रसिकशेठ धारिवाल त्यांच्या कार्याने मोठे झाले. मी आणि जान्हवी कार्यातून रसिकलाल यांना जिवंत ठेऊव त्यांचे कार्य पुढे सुरु ठेऊ. गरिबी आपल्या चेहऱ्यावर दाखवू नका. प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते. न्यूनगंड येऊ देऊ नका. सध्याइंग्रजीचा जमाना आहे त्यामुळे लिहिण्याबरोबरच विद्यार्थ्यांनी इंग्रजी अस्खलित बोलण्याचे ज्ञान प्राप्त करावे असे आवाहन त्यांनीकेले.
जान्हवी धारिवाल म्हणाल्या, जैन मुनीश्री पुलकसागरजी महाराज यांची तीन महिन्यांपूर्वी भेट झाली. ते कठीण परिस्थितीत धर्माचेपालन करतात. धर्माचे पालन केल्याने आपले कर्म आपोआप सुधारते. आपले वडील रसिकलाल धारिवाल यांनी कधीही हिम्मतसोडली नाही , कोणासमोर मान झुकवली नाही. एखादी गोष्ट मी करू शकत नाही असे त्यांच्या तोंडून मी कधीही ऐकले नाही. तेस्वत: मोठे झाले परंतु ते दानशूरही होते.युसुफ पठाण म्हणाले, जीवनात जे काही आत्ताचे माझे स्थान आहे. ते माझ्या आई-वडिलांमुळे आहे. आपले आई-वडील दोघेही कामकरायचे. वडील एका कंपनीत काम करून नंतर मशिदीत साफसफाईचेही काम करायचे. त्यांनी कधीही कुठली तक्रार करायची नाहीअशी शिकवण आम्हा भावंडांना दिली. त्यामुळे आज मी यश मिळवू शकलो. तुम्हीही तुमच्या जीवनात जेवढ्या तक्रारी कमी करालतेवढे मोठे तुम्ही व्हाल असे त्याने नमूद केले.
प्रारंभी जितेंद्र भूरूक व सहकार्यांनी प्रार्थना सादर केली प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ. रणजित जगताप यांचा विशेष सत्कार यावेळी
करण्यात आला. याप्रसंगी पाच विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मंचावर शिष्यवृत्तीचे चेक देण्यात आले. याप्रसंगी निवडकविद्यार्थ्यांनी कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या. सर्व विद्यार्थ्यांना याप्रसंगी चेक देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.सीमा गंगवाल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
मेहनतीनेच भाग्याचे दारे खुली होतील- जैन मुनीश्री पुलकसागरजी महाराज
Date:

