मुनिश्री पुलकसागरजी महाराजांच्या हस्ते ‘स्वरप्रतिभा’ दिवाळी अंकाचे प्रकाशन

Date:

दिवाळी सारख्या आनंद देणार्‍या सणामध्ये लक्ष्मीचे पूजन केले जाते, धन संपत्तीचे पूजन केले जाते. मात्र दिवाळी अंकांच्या माध्यमातून सरस्वती पूजन करण्याचा प्रयत्न अभिनंदनीय आहे. दिवाळी अंक प्रकाशित करणार्‍या सरस्वती पुत्रांचे मी कौतुक करतो, अशा शब्दात दिगंबर जैन मुनिश्री प.पू. 108पुलकसागरजी महाराज यांनी ‘स्वरप्रतिभा’ दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना कौतुक केले. सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग दिगंबर जैन मंदिर हॉलमध्ये झालेल्या प्रकाशन संमारंभावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सकल जैन वर्षायोग समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल, कार्याध्यक्ष मिलिंद फडे, ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

                मुनिश्री पुढे म्हणाले, जेथे तलवार देखील प्रभाव पाडू शकत नाही तेथे साध्या लेखणीचे सामर्थ्य जगाला उजळून टाकते, मी देशभर फिरत असतो मात्र त्यातही महाराष्ट्रात विशेषतः पुण्यात मला अनेक नवीन चांगल्या गोष्टी बघायला मिळाल्या. पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीत मराठीतील सर्वाधिक दिवाळी अंक प्रकाशित होतात, ही पुण्याच्या लौकिकात भर घालणारी बाब आहे असे सांगून त्यांनी मराठीतील सर्व दिवाळी अंकांना शुभेच्छा दिल्या.

                याप्रसंगी शोभा धारिवाल म्हणाल्या, दिवाळी हा मांगल्याचा सण आहे. मुनिश्री पुलकसागर महाराज यांच्या शुभहस्ते ‘स्वरप्रतिभा’ दिवाळी अंक प्रकाशित होत आहे ही मांगल्यात भर टाकणारी बाब आहे. साहित्य समृद्ध होण्यासाठी दिवाळी अंकांची गरज निश्चित मोठी आहे. सध्याच्या व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर अशा सोशल मीडियाच्या गर्दीतही दिवाळी अंकांचे स्थान व महत्व कायम आहे असे सांगून दिवाळी अंकाचे त्यांनी कौतुक केले.

                मिलिंद फडे यांनी म्हटले की, महाराष्ट्रात 400 हून अधिक दिवाळी अंक प्रकाशित होतात. त्यातील 100 हून अधिक दिवाळी अंक पुण्यात प्रकाशित होतात. त्यातून पुण्याच्या साहित्य समृद्धीचे दर्शन होते. घरोघरी पोचणारा दिवाळी अंक कुटुंबामध्ये आनंदाबरोबरच चांगले संस्कारही देत असतो.

                सुधीर गाडगीळ म्हणाले की, गेली 14 वर्ष संगीताला समर्पित ‘स्वरप्रतिभा’ दिवाळी अंक प्रकाशित होत आहे ही कौतुकाची बाब आहे. अशा दिवाळी अंकास मिळणारा मोठा प्रतिसाद समाधान देत आहे. माध्यम बदलत राहिली तरी दिवाळी अंकांचे मराठीतील स्थान अबाधित राहील.

                प्रारंभी दिवाळी अंकाचे संपादक प्रविण प्र. वाळिंबे यांनी मुनिश्री पुलकसागरजी महाराज यांनी अंकाला आशिर्वाद दिल्याबद्दल मुनिश्रींना धन्यवाद दिले. 20 वर्षांपूर्वी मिलिंद फडे यांच्या पुढाकाराने पुण्यात मराठी जैन साहित्य संमेलन भव्यतेने आयोजित केले गेले होते, याची आठवण सांगून वाळिंबे म्हणाले की, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत जैन संस्कृतिचा मोठा वाटा आहे. आता पुन्हा पुण्यात जैन मराठी साहित्य संमेलन आयोजित करावे तसेच जैन समाजाचा दिवाळी अंकही प्रकाशित करावा. त्यासाठी श्रीमती शोभा धारिवाल आणि मिलिंद फडे यांनी पुढाकार घ्यावा असे आव्हाहन त्यांनी केले.

                याप्रसंगी ‘अक्षरमिठाई’ कल्पना साकारून दिवाळी अंकांना प्रोत्साहन देणारे डॉ. शैलेश गुजर, ‘स्वरप्रतिभा टीम’चे मधू पोतदार, श्रुती तिवारी, अमोल बोरसे, अस्मिता फाटक राजे, तन्मयी मेहेंदळे, महेश माने यांचा सत्कार शोभाताई धारिवाल यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. भोजनानंतर हा कार्यक्रम संपला. कार्यक्रमास मोठी गर्दी होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भगवान परशुरामांच्या पुण्यातील एकमेव मंदिराच्या निर्मितीला प्रारंभ 

पुणे:ब्राह्मण महासंघ च्या वतीने  पुण्यातील शिवाजी रस्त्यावरील शाहू चौकातील...

महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे संवर्धन ही सर्वांची जबाबदारी:डॉ. सचिन जोशी

श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने व्याख्यान पुणे :...

डिजिटल छळही आता लैंगिक छळ, विनयभंगाच्या श्रेणीत; विधेयक मंजूर:महिला सुरक्षेसाठी फडणवीस आक्रमक

मुंबई - महाराष्ट्र विधानसभेने बुधवारी भारतीय न्याय संहिता विधेयक २०२६...

सोनिया दोन दिवसांपासून रुग्णालयात,राहुल रुग्णालयात रात्रभर सोफ्यावर झोपले

नवी दिल्ली- काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी गेल्या...