पुलकसागरजी महाराज भव्य शोभायात्रेव्दारे मंगल प्रवेश संपन्न..पहा फोटो आणि व्हिडीओ झलक …
पुणे: आपल्या ओघवत्या वाणीने आणि तेजस्वी विचारांनी देशभर पायी अनवाणी फिरत धर्मजागरण व समाज प्रबोधन करणारे दिगंबर जैन मुनीश्री प. पू. 108 पुलकसागरजी महाराज यांचे आज भव्य शोभा यात्रेव्दारे पुण्यात स्वागत करण्यात आले. त्यावेळी जमलेल्या सर्व भाविकांनी मुनीश्रींचा जयजयकार केला. तसेच मुनीश्रींच्या पुण्यातील या चुर्तुमासाचे संयोजन पुणे व परिसरातील सकल जैन समाज व संस्था यांनी केलेलेे आहे.
सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग जैन मंदिर येथे मुनीश्रींचे पाद्यपूजन करण्यात आले. व त्यानंतर या भव्य शोभायात्रेस सुरूवात झाली. प्रारंभी रांका ज्वेलर्स चौक येथे फत्तेचंद रांका, ओमप्रकाश रांका व कुटुंबियांनी मुनीश्रींचे विधीवत स्वागत केले. ही शोभयात्रा सिंहगड रस्ता राजराम पूल मार्गे धर्मानुरागी रसिकलाल एम. धारीवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स कर्वेनगर पुणे येथे सायंकाळी 5 च्या सुमारास पोहोचली. या प्रसंगी मंडपात प्रवेश करताना सा्ै.मीना फडे व मिलिंद फडे यांनी पादप्रक्षालन करून त्यांचे स्वागत केले.पुणेकरांच्यावतीने महापौर सौ. मुक्ता टिळक यांनी मुनीश्रींचे श्रीफळ देऊन स्वागत केले.
या शोभायात्रेत प्रारंभी सनई चौघडा, बँण्ड, ढोल लेझीम पथके होती. यात जैन भाविक सहभागी झालेल्या या शोभायात्रेत मुनश्रींची प्रतिमा असलेले सुशोभित केलेले दोन चांदीचे चित्ररथ होते. तसेच कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील श्री गोमटेश्वर महामस्तकाभिषेकाचे प्रतिकृती असलेला भव्य चित्ररथही होता. मंगल कलश घेऊन केशरी रंगाच्या साड्या हा पेहराव केलेल्या महिला व पुणेरी पगडी बाराबंदी व उपरणे घातलेले पुरूष,नववारी साडी नेसलेल्या महिला भाविक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शोभायात्रेच्या वाटेवर ठिकठिकाणी स्थानिक नागरिकांकडून मुनीश्रींचे स्वागत होत होते. वाहतुकीला कोणताही अडथळा न आणता शिस्तीने शोभायात्रा चालली.
ही शोभायात्रा धर्मानुरागी रसिकलाल एम धारीवाल नगरी महालक्ष्मी लॉन्स येथे उभारण्यात आलेल्या अतीभव्य व सुशोभित मंडपात पोहोचली. त्यानंतर भाविकांची मुनीश्रींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली. मुनीश्रींचा चार्तुरमास याच मंडपात संपन्न होणार असून त्यासाठी 66 हजार चौरस फूटांचा भव्य मंडप उभारण्यात आला आहे. मंडपात 50 बाय 20 फूट आणि 50 बाय 26 फूट अशी दोन स्टेज उभारण्यात आली आहेत. स्टेजवर मंदिराच्या प्रतिकृतीचा आकर्षक बॅकड्रॉप उभाण्यात आला असून मंडपाचे प्रवेश व्दार मंदिराच्या प्रतिकृतीने सजले आहे. मंडपात पाच हजाराहून अधिक खुर्चांची व्यवस्था करण्यात आली असून एलईडी स्क्रिनसह स्वतंत्र भोजनकक्षही उभारण्यात आला आहे. येथे येणा-या सर्व हजारो भाविकांना विनामूल्य नाष्टा व भोजन दिले जाणारे आहे.
या मंगलप्रवेश समयी सर्वांना आर्शीवाद देताना मुनीश्री म्हणाले की, पुण्यात लक्ष्मी, शा्ै्र्य, सरस्वती, स्वाभिमान हे सारे आहे पण माणसामाणसातील हास्य लोप पावत आहे ,रस्ते रूंद झाले पण मने संकुचित झाली इमारती उंच झाल्या माणसे खुजी झाली. माणसा माणसातली मानवता लोप पावत आहे ती जाग्रुत करण्यासाठी मी आलेलो आहे. सर्व धर्म,जात यांपेक्षा माणुसकी हा धर्म मोठा आहे. हे समजावण्या करिता मी आलेलो आहे.
या प्रसंगी मुनीश्रीं समावेत शोभायात्रेत सकल जैन वर्षायोग समितीच्या अध्यक्षा श्रीमती शोभा धारीवाल कार्याध्यक्ष मिलिंद फडे, उपाध्यक्ष चकोर गांधी , सुजाता शहा, जितेंद शहा, वीरकुमार शहा, सुनील खोत ,अजित पाटील, अभय़ संचेती, उत्कर्ष गांधी ,अभय कोठारी, मीना फडे, आचल जैन,ओमप्रकाश रांका , नगरसेवक प्रवीण चोरबोले,डाॅ कल्याण गंगवाल , रावसाहेब पाटील ,डाॅ निलम जैन,आदि प्रमुख मान्यवर होते. मुनीश्री रोज सकाळी 8 ते 10 आणि सायंकाळी 5 ते 7 यावेळेत दर्शन देणार असून रोज प्रवचने, सत्संग होऊन सायंकाळी सात वाजता भगवान व मुनिश्रींची मंगल आरती केली जाईल. भाविकांच्या सोयीसाठी सर्वत्र स्वयंसेवक तसेच पार्किंगची व्यवस्था मोठी करण्यात आली आहे.
(all video shoot by Unity Services and news -photo by praveen walimbe)