पुणे-कीर्तनकलानिधी ह.भ.प. कै. डॉ. अनंतबुवा मेहेंदळे यांच्या २६ व्या पुण्यतिथी निमित्ताने पुण्यातील भिकारदास मारुती मंदिरा जवळील नारद मंदिर येथे रविवार दि २२ एप्रिल ते मंगळवार दि २४ एप्रिल असे तीन दिवस रोज ,सायंकाळी ६ ते ८ या वेळेत ‘अनंत स्मृती कीर्तन महोत्सव २०१८ ‘ साजरा करण्यात येणार आहे.या कीर्तन महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी २४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळात जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प सौ तारा देशपांडे यांना दरवर्षी दिला जाणारा अनंत स्मृती कीर्तन पुरस्कार प्रदान केला जाणार आहे रोख रक्कम , स्मृतीचिन्ह ,सन्मानपत्र शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे या कीर्तन महोत्सवात दि २२ एप्रिल रोजी ह. भ. प श्री मनोहरबुवा जोग (गोवा )यांचे कीर्तन होणार असून सोमवार दि २३ एप्रिल रोजी कीर्तन विशारद ह.भ.प सौ निवेदिता मेहेंदळे (पुणे) यांचे पूर्वरंग ‘शक्ती ही देवता’ आणि उत्तररंग ‘विवेकानंद’ या विषयावर कीर्तन होणार असून दि २४ एप्रिल रोजी अनंत स्मृती कीर्तन पुरस्काराच्या मानकरी जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प सौ तारा देशपांडे यांचे पूर्वरंग ‘त्यागिता हा देह’ आणि उत्तररंग ‘मयूरध्वज’ या विषयावर कीर्तन सादर होणार आहे. हा महोत्सव सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामुल्य आहे .

