मास्कपुराण…उत्तरार्ध (लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)

Date:

“मॅडम तुम्ही ऑस्ट्रेलियाला जाऊन आल्याला आता बरेच दिवस झाले. तुमचा ‘मास्कपुराण’ हा लेख वाचला होता, आता येण्याचा अनुभवही सांगा ना…” माझे स्नेही पत्रकार उन्मेष गुजराथी यांचा फोन आला. आणि परतीच्या प्रवासाचे चित्र माझ्या डोळ्यांसमोर तरळले…

“ताई, आठवणीने माझ्याकडून मास्क घ्या हं. आता परत जाताना लागतील तुम्हाला ते.” इति…जान्हवी. परतीच्या प्रवासाची गडबड चालू होती. ऑस्ट्रेलियाची सफर संपत आली होती. बघता बघता २१ दिवस कसे गेले तेच कळलं नाही. आधी सिडनी आणि मग मेलबर्नला भावाकडे मुक्काम. सगळे दिवस खूपच मजेत आणि आरामात गेले. आता परत बॅग्स भरायच्या म्हणजे महाकर्मकठीण काम आणि त्यात जान्हवी- माझ्या वहिनीने मास्कची आठवण करून दिली. अरे देवा…आता परत आम्ही ‘मास्कधारी’. त्या विचारानेच पोटात गोळा आला. पण त्याला पर्याय नव्हता, कारण करोना व्हायरसने आतापर्यंत बऱ्याच देशांत शिरकाव केला होता. परिस्थिती अधिक चिघळली होती.

मेलबर्न एअरपोर्टला तरी तेवढ्या प्रमाणात मास्कधारी दिसत नव्हते. सुरक्षा व्यवस्था मास्टर पहिल्यापेक्षा अधिक कडक वाटत होती… एअरपोर्टवरील कर्मचारी मात्र सुरक्षेच्या दृष्टीने मास्क धारण करून होते. अर्थात काही प्रवासी होते तसे मास्क धारण करून. ते दृश्य पाहून मीही पर्समध्ये मास्क घेतले आहेत की नाही याची पुनः पुन्हा खात्री करून घेतली.

 

चेक इनला विंडो सीट मिळेल का विचारल्यावर कळले की फ्लाईट तसे पूर्ण भरलेले नाही, त्यामुळे शक्यता आहे. आम्ही क्वांटास एअरवेजने प्रवास करणार होतो. फ्लाईटमध्ये बसल्यावर थोड्या वेळात अंदाज आला की फ्लाईट ७० टक्केच भरलेले आहे. बहुतकरून परदेशी प्रवाशांनी मास्क धारण केलेले आहेत. आम्ही मात्र ठरवलं की हाँगकाँगला पोहोचल्यावर मास्क घालू. आमच्या सीटच्या मागे बहुदा एक चायनीज फॅमिली असावी, त्या सगळ्यांनी मास्क धारण केले होते. फ्लाईटने टेक ऑफ केले आणि मग आम्ही विंडो कुठे कुठे आहे ते बघून स्थानापन्न झालो. ट्रेनमध्ये विंडोच काय पण चौथी सीट जरी मिळाली की कसा हर्ष होतो, तसाच किंबहुना त्यापेक्षा जरा जास्तच परमानंद फ्लाईटमध्ये विंडो सीट मिळाल्यावर झाला. बाकी आजूबाजूला कोणीही नाही, दोन्ही सीट रिकाम्या. मग हाँगकाँग येईपर्यंत मस्त ताणून दिली. या वेळीही आमची ब्रेक जर्नी होती. मेलबर्न ते हाँगकाँग आणि हाँगकाँग ते मुंबई.

हाँगकाँग एअरपोर्ट वरील भयाण शांतता पाहूनच अंदाज आला की इथे करोनाचे तीव्र पडसाद उमटलेले आहेत. हाँगकाँगला चेकिंगही डोळ्यांत तेल घालून करत होते. पुढील आमचे फ्लाईट म्हणजेच हाँगकाँग ते मुंबई हे गेट नं. ३१ ला होते. म्हणून आम्ही वेळ न दवडता चालू लागलो. आता आजूबाजूला सगळेच मास्कधारी होते. आम्हीही हाँगकाँग एअरपोर्टला उतरतानाच मास्क धारण केला होता. तुरळक प्रवासी सोडले तर बाकी सगळीकडे भयाण शांतता होती. सगळे पोर्टवरील शॉप्सही रिकामे होते. कुणी कस्टमरच नाही. सगळ्या शॉप्सनी डिस्काऊंट आणि सेलची लयलूटच केली होती. पण एकही जण त्या प्रलोभनांना बळी पडत नव्हता. आमच्या डिपार्चरच्या ३१ नंबर गेटवर किंवा आणखी १-२ गेट वरच काय ते प्रवासी होते. हा भला मोठा सतत वर्दळीचा एअरपोर्ट आज ओस पडला होता. आमच्या फ्लाईटच्या बोर्डिंगला अजून १ तास अवकाश होता; म्हणून आम्ही एकाच ठिकाणी बसून आजूबाजूचे निरीक्षण करत होतो. एअरपोर्टवरील कर्मचारी सतत साफसफाई करत होते आणि औषधी फवारे मारत होते. आजूबाजूचे सगळेच प्रवासी एकमेकांकडे भयग्रस्त नजरेतून पाहत होते. फ्लाईटचे बोर्डिंग जरा उशिराच चालू झाले. क्वांटास एअरवेजच होती पण यावेळी आमचे फ्लाईट कॅथे पॅसिफिकचे होते. फ्लाईट नंबर सी एक्स ६८५.

फ्लाईटमध्ये ओकेबोके वाटत होते म्हणून एअरहोस्टेसकडे जुजबी चौकशी केली, तेव्हा कळलं की ४०० प्रवाशांची क्षमता असलेल्या फ्लाईट मध्ये जेमतेम शंभरच प्रवासी होते. गेले काही दिवस करोनामुळे हीच परिस्थिती कायम आहे. यावेळी तर मजाच(?) होती आमची. फ्लाईट रिकामे असल्यामुळे कुठेही बसा. मनात मात्र एक प्रकारची भीती दाटून आली होती. कधी एकदाचे आपल्या मायदेशी जातोय आणि या सगळ्यांतून सुटका होतेय असं वाटत होतं. मास्कचा तर पुरता वीट आला होता.

मुंबई एअरपोर्टवर उतरलो आणि जीवात जीव आला. हेल्थ डिपार्टमेंटचा फॉर्म समोर आला. आता हे काय नवीन ???? आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीने हा फॉर्म भरून देणे आवश्यक होते. त्यात तुम्ही कुठल्या कुठल्या देशात प्रवास केला या संबधीची माहिती भरून द्यायची होती. आम्ही ऑस्ट्रेलियाला गेलो होतो मात्र ब्रेक जर्नी हाँगकाँगला असल्यामुळे एकाचे चेकिंगही अधिक सुरक्षेत झाले. टेम्परेचर तर २ वेळा चेक केले गेले तसेच सिंगापुर, मलेशिया, हाँगकाँग, जपान…अशा काही देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी इमिग्रेशनसाठी वेगळे ३ ते ८ नंबरचे काउंटर होते. तिकडेही भली मोठी रांग आणि काही जणांना तर प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरे जावे लागले. तब्बल २ तासांनी इमिग्रेशन मधून आमची सहीसलामत सुटका झाली. तोपर्यंत मास्क घालूनच होतो. मुंबई एअरपोर्टच्या बाहेर आलो. हुश्श…म्हणून एक दीर्घ श्वास घेतला आणि आणि मास्क काढून बॅगेत ठेवला…

या सगळ्यांतून तावून सुलाखून सुटलो असे वाटत असतानाच दोन दिवसांनी महापालिकेतील डॉक्टर घरी हजर… तुम्ही आताच परदेशातून आला आहेत ना? तुमची चौकशी करायला आलो आहोत…!

आम्ही परत येऊन आता २१ दिवसहि होऊन गेलेत. आम्हाला मात्र कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही, आम्ही सगळे सुखरूप आहोत.

 

पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग,

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.),

मुंबई – 400068

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अरण्येश्वर प्रभात शाखेच्या क्रीडा स्पर्धांचा गुरुवारी शुभारंभ

पुणे - रा.स्व. संघाच्या सहकारनगर भागातील अरण्येश्वर प्रभात शाखेतर्फे...

सर्व धर्मीय ख्रिसमस स्नेह मेळावा संपन्न

पुणे; पुण्यातील येरवडा – शास्त्रीनगर भागातील सेक्रेड हार्ट चर्च येथे...

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जास्तीत जास्त दर देण्याचा विचार•...

राज बब्बर,रमेश बागवे, मोहन जोशी,वसंत पुरकेंसह काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर.

मुंबई, दि. २३ डिसेंबर २०२५ राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस...