पुण्याची कैफियत….मुख्यमंत्र्यांपुढे…..

Date:

पुणे-

करोनाच्या काळात नागरिकांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महापालिकेच्या वतीने शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या लढाईत राज्य सरकारकडून आवश्यक असलेल्या मदतीचा कोणताही हात पुढे आलेला नाही. रेमडेसिव्हर इंजेक्शन कोटा, पुरेसा ऑक्सिजन यासह लसीकरणासाठी लसींचा पुरवठा राज्य सरकारकडून मिळत नसल्याची कैफियत पालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी मांडली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून बिडकर यांनी ही कैफियत मांडली आहे. पुणेकर गेल्या १४ महिन्यांपासून करोनाच्या विरोधात लढा देत आहे. मुंबईपेक्षा अधिक गंभीर स्थिती पुण्यात आहे. शहरात करोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आतापर्यंतच्या कालावधीत पुणे पालिकेने तक्रारीचा कोणताही सुर न लावता आपले कर्तव्य पार पाडण्याचीच भूमिका घेतली आहे. शहरातील आरोग्यसेवा भक्कम केली. परिणामी देशातील मोठ्या शहरांच्या तुलनेत सर्वाधिक बेड्स आणि व्हेंटिलेटर बेइस विकसित करण्यात पुणे अव्वल शहर ठरले आहे. मुंबई, दिल्ली, बेंगळुरू चार मेट्रो सिटींच्या तुलनेत दर दहा हजार नागरिकांच्या मागे सर्वाधिक ‘सीसीसी’ बेड्स, ऑक्सिजन बेड्स आणि व्हेंटिलेटर बेड्स पुण्यात विकसित झाले, हे आम्ही अभिमानाने सांगतो. हे सर्व करताना राज्य सरकारचा मदतीचा भक्कम हात कधीही पुढे आला नाही.
शहरात आरोग्यव्यवस्था उभी करताना आम्ही कधीही हात पसरले नाहीत. कोठून तरी निधी मिळेल, याची आशाळभूतपणे वाट न पाहता, ३५० कोटींहून अधिक निधी करोनाविरोधातील लढाईत पुणे महापालिकेने खर्च केला आहे. शहरातील उद्योजक, स्वयंसेवी संस्था यांच्याबरोबर मोट बांधून आम्ही करोना संकटाशी झुंजतो आहे. वैद्यकीय सुविधांमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नगर या जिल्ह्यांतून पुण्यात उपचारासाठी धाव घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. पुण्यासह इतर जिल्ह्यातील रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी पुणे पार पाडत असेल तर पुण्याला आवश्यक असलेली मदत करण्याची जबाबदारी राज्य सरकारची नाही का? शहराला रेमडेसिव्हर इंजेक्शन्सचा कोटा देताना पुण्यावरील वाढीव जबाबदारीचा विचार व्हायला नको का? ऑक्सिजनचा पुरवठा होताना वाढीव जबाबदारीचा विचार होणार की नाही? इतर शहरांना आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध होतो, तसा तो पुण्यालाही व्हावा, असे आम्हाला वाटले, तर आमचे काही चुकते आहे का? असा प्रश्न बिडकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना विचारला आहे. ‘जाणता राजा’ अशा सार्थ शब्दांत शिवछत्रपतींचा गौरव केला जातो. शिवछत्रपतींची ही परंपरा पाळणे कोणत्याही राज्यकर्त्याचे कर्तव्य आहे, अशी आमची भावना असून राज्याचे कुटुंब प्रमुख म्हणून पुणे शहराला न्याय द्यावा, अशी अपेक्षा बिडकर यांनी व्यक्त केली आहे.

गंभीर कोरोनास्थिती लक्षात घेता, शहराला पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा. वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता तातडीने करून देण्याबरोबरच लसीकरणासाठी पुण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

  • गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महापालिका
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...