कोरड आहे घशाला … मेट्रो आणि विमान, स्वप्नाला … वाह रे अच्छे दिन ..

Date:

पुणे- पुणे शहर आणि जिल्ह्यात नेहमीप्रमाणे यंदाही प्यायला पाणी नाही… दिवसाआड तीन  तास पाणीपुरवठा शहरात होत असताना … पिण्याच्या पाण्याचा साठा कसा वाढवायचा ते सोडून भाजपचे खासदार आमदार आणि महापालिकेतील गटनेते ..गतिमान मेट्रो कशी येईल… आंतरराष्ट्रीय विमानतळ कसे होईल ? म्हणजेच करोडो अब्जावाधींची कामे कशी होतील / त्यांची टेंडर्स कशी निघतील याकडे च आकर्षित होवून कामे करताना -किंवा तेवढेच बोलताना तरी दिसत आहेत . पेट्रोल -डीझेल दरवाढ पाचवीला पुजली आहेच … कामगार क्षेत्रात असुरक्षित वातावरण आहेच आहे …सर्वांनाच पैशाच्या मागे धावावे लागत आहेच आहे … त्यात आता भर … पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत आहे. हवामान खात्याचे अंदाज … रोज २ दिवसात पाऊस पडेल असे येत आहेत . पण ना शेतीला पाणी ना पिण्यास मुबलक पाणी अशी अवस्था पुण्याची असताना भाजप मात्र मेट्रो आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावरच बोलत आहे . खासदारांचे सोडा …विधानसभेत आठ म्हणजे १०० टक्के  आमदार असताना हे हे  आमदार २ वर्षात शहरासाठी काहीही करू शकलेले नाहीत. ना पिण्याच्या पाण्याच्या साठवणुकीसाठी त्यांनी काही केले ; ना शेतीच्या पाण्यासाठी साठा वाढविणारी योजना त्यांनी २ वर्षात आणली . पाणी हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असताना त्यांना मेट्रो- आणि विमानातच का सर्वप्रथम रस वाटतो आहे ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.एवढेच नाही तर शहरात सर्वत्र उष्मा वाढविणाऱ्यां सिमेंटच्या रस्त्यांना आणि सिमेंटच्या जंगलांना हि भाजपची साथ असल्याचे स्पष्ट दिसते आहे . जल है तो कल है हे जाणून बुजून विसरल्याचे ढोंग केले जात आहेकाय? हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो आहे . 

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...