पुणे- खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात आल्यानंतर शिवणे गावातुन नांदेड गावाकडे जाण्यासाठीचा जोड पुल पुन्हा एकदा मुठेच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे पाण्याखाली गेला असून, त्यामुळे नांदेड गाव आणि परीसरातुन शिवणेमध्ये येणाऱ्या नागरिकांना लांब फिरून जाण्याची वेळ येत असते
पुलाचे संरक्षक दगड जरी पाण्याखाली गेले नसले तरी पाण्याला वेग मात्र आहे असे असताना देखील काही नागरिक, वाहनचालक लांबचा फेरा आणि वेळ वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालून पूल ओलांडत आहे . धोका पत्करून होणारी हि वाहतूक जागेवर गमतीने घेतली जात असली तरी हे धाडस मात्र अनेकांना महागात पडणारे ठरू शकते .