पुणे-
अखेर बरसला .. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट घेवून;रिमझिम का होईनात,बरसला ..सुखद …मेघराजा … सायंकाळी साडेपाच वाजता तो पुणे शहरात बरसला . अनेकांनी भिजणे पसंद केले . आणि अनेकंची तारांबळ ही उडाली . पण या सुखद सरींचे सर्वांनीच स्वागत केले . येथे आम्ही शेअर केलेले फोटो हे पुणे महापालिकेचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वर आनंदाने शेअर केलेले आहेत .
पावसाबद्दल मागील १५ दिवसांपासून पुणे वेधशाळेने सतत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले होते. यावेळी पावसाळा वेळेत सुरु होणार,आणि भरपूर-सरासरीहून अधिक पाउस होईल असे भाकीतही पुणे वेधशाळेने केले होते. पण २ दिवसात होईल /२ दिवसात होईल या आशा फोल ठरत होत्या.आणि ये रे घना..ये रे घना… अशी काकुळती वाढतच होती . आज अखेर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुणे मध्यवर्ती परिसर, उपनगर तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात पावसाने ढगांच्या गडगडाटासह हजेरी लावली. आणि क्षणिक असला तरी सुखद धक्का दिला



