पुणे – लोणावळा दरम्यान मध्य रेल्वेकडून रविवारी मेगा ब्लॉक

Date:

पुणे-तांत्रिक दुरुस्तीसाठी उद्या पुणे ते लोणावळा स्टेशन दरम्यान सकाळी 11.40 ते दुपारी 4.10 या काळात मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे कर्जत पुणे कर्जत पैसेंजर, सिंहगड एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस यांसह पुणे लोणावळा लोकलही रद्द करण्यात आल्या आहे.

सिग्नल यंत्रणेतील सुधारणांसह इतर तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेकडून रविवारी पुणे ते लोणावळा दरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे यादिवशी प्रगती व सिंहगड एक्सप्रेससह काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही गाड्या उशिराने धावणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हा ब्लॉक सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० यावेळेत राहणार आहे. सिग्नल यंत्रणेतील सुधारणेमुळे या मार्गावरील रेल्वे गाड्यांची ये-जा अधिक सुलभपणे होणार आहे. त्यासाठी कामशेत ते तळेगाव दरम्यान असलेल्या आॅटोमॅटिक सिग्नल यंत्रणेत सुधारणा केल्या जाणार आहेत. तसेच ब्लॉकच्या कालावधीत कामशेत व वडगाव दरम्यान असलेल्या पुलाच्या बांधणीसाठीचे आवश्यक काम केले जाईल. त्यामुळे या वेळेत रेल्वेगाड्यांवर परिणाम होणार आहे, असे मध्य रेल्वेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
मेगा ब्लॉकमुळे मुंबई -पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस, मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस आणि कर्जत-पुणे-कर्जत पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस-काकीनाडा पोर्ट एक्सप्रेस, मुंबई-नागरकोईल एक्सप्रेस या गाड्या लोणावळा व कामशेत स्थानकादरम्यान १ तास २५ मिनिटांसाठी थांबविल्या जातील. तर मुंबई-हैद्राबाद एक्सप्रेस ही गाडी १ तास आणि हुबळी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसला तब्बल ३ तास २५ मिनिटे थांबविले जाईल. मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेसही पुणे ते देहूरोज दरम्यान २० मिनिटे थांबेल. पुणे स्थानकातून सकाळी ११.४५ वाजता सुटणारी भुसावळ एक्सप्रेस रविवारी दौंड-मनमाड यामार्गे सोडण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

पुण्याहून सुटणाऱ्या रद्द लोकलच्या वेळा – सकाळी ६.३०, ६.५०, ८.५७, ९.५५, ११.२० (शिवाजीनगर), दुपारी १२.१५, १, ३, व ३.४०.

लोणावळ्याहून सुटणाऱ्या रद्द लोकलच्या वेळा – सकाळी ६.३०, ७.५०, ८.२०, ९.५७ (तळेगाव), १०.१०, ११.३०, दुपारी २, २.५०, ३.४०, ४.३८ (तळेगाव).

 

 

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...