बहुजन समाजातील शक्तिशाली नेते पोलिसांच्या मदतीने संपविण्याचे पालकमंत्र्यांचे कारस्थान -रवी धंगेकर

Date:

पुणे- राज्यात आणि केंद्रात भाजप सरकार बहुमताने राज्य करीत असल्याने पुण्याचे पोलीस हे गेली २ ते अडीच वर्षांपासून पालकमंत्री गिरीश बापटांच्या दबावाखाली काम करत असून त्यांच्याच इशाऱ्यावर ते विरोधी पक्षांमधील मातब्बर नेत्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना जेरीस कसे आणता येईल अशा दृष्टीने राबत असल्याचा घणाघाती आरोप कॉंग्रेसचे नगरसेवक रवी धंगेकर यांनी केला आहे. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस मधील शक्तिशाली नेत्यांना बापट हे पोलिसी बळाचा अतिरेकी वापर करून संपविण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यात बहुतेक मराठा व दलित समाजाच्या नेत्यांचा समावेश असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. धंगेकर हे मनसे तून कॉंग्रेस मध्ये आलेले आहेत तत्पूर्वी त्यांना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न झाले होते . धंगेकर यांनी अतिरिक्त आयुक्तांवर चप्पल फेकल्या प्रकरणी त्यांच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल झालेला आहे .

अलीकडे धंगेकर यांनी ‘महापालिका सेवकास मारहाण केल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे ,हि तक्रार खोटी असून, महापालिकेतील ‘सीसीटीव्ही’मध्ये घडलेला हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. त्या ‘सीसीटीव्ही’मध्ये मी कुठेही सेवकाला मारहाण केली नसल्याचे स्पष्ट दिसते आहे. मात्र, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या दबावातून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत,’ असा आरोप नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात महापालिका सेवक साईनाथ थोरात यांना मारहाण केल्याप्रकरणी धंगेकर यांच्यासह दोघांवर नुकताच अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धंगेकर यांनी पालिकेतील ‘सीसीटीव्ही’ फुटेज मिळवत घटलेल्या घटनेची माहिती दिली. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार थोरात यांना मारहाण झाली त्या वेळी त्यांनी काहीही केलेले नाही. धंगेकर यांच्यासमवेत असलेला कार्यकर्ता आणि थोरात यांच्यात बाचाबाचीचा प्रकार घडला. धंगेकर यांनी तो वाद सोडविण्याचा प्रयत्नही केला. हे सर्व ‘सीसीटीव्ही’ फुटेजमध्ये स्पष्ट दिसत असून, बापट यांच्याकडून खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी दबाब आणण्यात येत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

येरवडा कारागृहात 5 मोबाईल,2 पॉवर बँक,चार्जिंग वायर सापडली..

पुणे- येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न...

माझी गाणी आजही रसिकांच्या पसंतीत -सिनेगीतकार समीर अंजान

'एमआयटी एडीटी' विद्यापीठाच्या 'पर्सोना महोत्सवा'ची उत्साहात सांगता लोणी-काळभोर (पुणे)...

अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धेत सलग दहा वर्षे विजेतेपदाची परंपरा कायम!

पिंपरी चिंचवड महापालिकेचा दणदणीत विजयपिंपरी : पुणे आंतर कचेरी...