पुणे- धनकवडी येथील तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य आणि दक्षिण पुण्यातील राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते कायम पक्षातून वेगळी वागणूक मिळाल्याने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या वाटेवर निघाल्याचे वृत्त आहे .
आज दुपारी मुंबईत ते शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेवून शिवसेनेत प्रवेश करतील असे समजते .
खेडेकर हे गेली ३२ वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत . ग्रामपंचायत असताना त्यांचे सत्तास्थानात प्राबल्य होते . महापालिकेत या भागाचा समावेश झाल्यावर देखील सह्याद्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे निष्ठावंत म्हणून त्यांनी अनेक उपक्रम राबविले .
धनकवडी प्रभाग क्रमांक ३९ मधून ते निवडणूक लढविण्यास इच्छुक असून त्यांनी व्यक्तिगत पातळीवर त्यांच्या प्रचाराचा प्रारंभ देखील केला आहे .

