मला निमंत्रण नसताना मेट्रो भूमिपूजन सोहळ्याला मी जाणार कसा ? : खा.संजय काकडे

Date:

पुणे-पुण्यातील मेट्रो ३ मार्गिकेच्या भूमिपूजन सोहळ्यात अनुपस्थित राहणारे भाजपाचे राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे यांनी ,’मला पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्याचे निमंत्रण नव्हते तर मी कसा जाणार ..? असा प्रश्न उपस्थित केल्याने भाजपच्या अंतर्गत गोटातील ‘खेचाखेचीचे ‘ राजकारण स्पष्ट झाले  आहे .एकीकडे अशा पद्धतीने काकडे यांना डावलण्याचे कारस्थान भाजपमध्ये होता असताना भाजपचाच सूर आवळत काकडे यांनी ..मात्र …. ‘माझे मेरिट पाहता भाजपा लोकसभा लढविण्याची मलाच संधी देईल,’ असे वक्तव्य केले आहे . शेतकरी कर्जमाफी चा विषय भाजपने पूर्वीच करायला हवा होता ..असे यावेळी पष्ट करून  पक्षाच्या कार्यपद्धतीवर  एक प्रकारे नाराजीच व्यक्त केली आहे .

आज सकाळी पुण्यातील एका हॉटेल मध्ये नेहमी रंगणाऱ्या सर्वपक्षीय गप्पांच्या कट्ट्यावर खासदार संजय काकडे आणि अन्य पक्षांचे नेते,कार्यकर्ते जमले असताना एका वृत्त वाहिनीने यावेळी सर्वांना प्रश्न करीत लोकसभेच्या पुण्यातील जागांबाबत चर्चा घडविली .यावेळी संजय काकडे यांनी हि मते व्यक्त केली .

 पुण्याचा भावी खासदार कोण ? यावर  संजय काकडे, मोहन जोशी, राष्ट्रवादी प्रवक्ते अंकुश काकडे, शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे , भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक गोपाळ चिंतल आदी नेतेमंडळी उपस्थित होती. ‘ब्रेकफास्ट पे चर्चा’वर या नेत्यांमध्ये राजकीय गप्पांचा फड रंगला. पुण्याचा भावी खासदार कोण, याप्रश्नावर संजय काकडे म्हणाले, मी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून पुण्याची जागा लढवणार आहे. माझा मेरिट पाहता पक्ष मला संधी देईल आणि मी आता पर्यंत दीड लाख सभासद केले आहे. मी आता जनतेमधून संसदेत जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.मंगळवारच्या भूमिपूजन सोहळ्यात संजय काकडे अनुपस्थित होते. मुंबईतदेखील भाजपाने सहयोगी पक्षांना निमंत्रण दिले नव्हते आणि पुण्याच्या कार्यक्रमाला मला बोलवलं नाही म्हणून गेलो नाही, असे काकडे यांनी सांगितले.दरम्यान, संजय काकडे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. राम मंदिराचं राजकारण सोडून आता भाजपाने विकासाकडे वळलं पाहिजे असा घरचा अहेर त्यांनी दिला होता.

यावेळी ,त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना , राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या वाढदिवसाला आपण दरवेळी त्यांची भेट घेतो तशी यावेळी घेतली. त्यात काही राजकीय कारण नव्हते असे स्पष्ट करत …भाजप मलाच लोकसभेची उमेदवारी देईल ..त्यामुळे अन्य पक्षांकडे मला जाण्याची वेळ येआणार नाही याचा पुनरुच्चार हि त्यांनी केला .मी भाजपकडून इच्छूक आहे. माझे मेरिट पाहता माझ्याशिवाय निवडून येणारा भाजपमध्ये कोणी आहे असे मला वाटत नाही. त्यामुळे तिकीट मलाच मिळणार,” असे संजय काकडेंनी सांगितले. “मी काही सर्व्हे केला नाही पण माझ्या कार्यकर्त्यांनी तो केला आहे. त्यानुसार 72 टक्के पुणेकरांनी मला पसंती दिली आहे. उरलेल्या 28 टक्क्यांमध्ये इतर सर्व शिरोळे, बापट आदी उमेदवार आहेत,” असेही त्यांनी सांगितल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. तिकीट कोणाचेही घेऊन मी लढलो तरी तीन लाख मतांनी मी निवडून येणार. 2019 मध्ये पुण्याचा खासदार मीच होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संजय काकडे यांच्या या बॅटिंगनंतर राष्ट्रवादीचे अंकुश काकडे यांनी त्यांना चिमटा काढला. `निवडणूक आयोगाने परवानगी दिली तर संजय काकडे दोन तिकिटांवर निवडणूक लढवू शकतात, असा टोला त्यांनी लगावला. “उमेदवारी ठरवण्याची एक व्यवस्था भाजपकडे आहे. इच्छा कोणीही व्यक्त करू शकते. पक्ष ठरवेल त्यालाच उमेदवारी मिळेल,” असे भाजप नगरसेवक गोपाळ चिंतल यांनी सांगितले.

मोहन जोशी यांनी सांगितले की काँग्रेसमध्ये नेहमी निष्ठावंतांना संधी मिळते. त्यामुळे आता इच्छुकांची गर्दी वाढली असली तरी त्याची चिंता आम्हाला नाही. पुण्यात भाजपचा खासदार दुसऱ्यांदा निवडून येत नाही हा इतिहास आहे. अण्णा जोशी दुसऱ्यांदा उभे राहिले आणि पडले. प्रदीप रावत 99 ला निवडून आले 2004 ला पडले. अनिल शिरोळे देखील 2014 मध्ये निवडून आले 2019 मध्ये त्यांचा पराभव होईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पारंपरिक प्रचाराला आधुनिकतेची जोड! बीडकरांची प्रचारात आघाडी; प्रभाग २४ मध्ये फिरू लागले ‘विकासरथ’

पुणे-महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता इच्छुकांच्या नजरा प्रमुख पक्षकांकडून...

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...