पुणे – गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात संपन्न होण्यासाठी शहरातील नागरिकांचा कार्यकर्त्यांचा एकमेकांशी समन्वय राहावा . गणेशोत्सव व बकरी ईद काळात सलोख्याचे वातावरण ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन . पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आणि सहआयुक्त सुनिल रामानंदयांनी केले आहे . संवेदनशील आणि महत्वाच्या पोलीस ठाण्यांना भेटी देवून त्यांनी बंदोबस्ताचा आढावाघेण्याचे काम सुरु ठेवले आहे .
लष्कर व समर्थ पोलीस स्टेशन परिसरातील गणेश मंडळे, शांतता कमिटी, कुरेशी समाज तसेच पोलीस मित्र सदस्यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. यावेळी पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पोलीस उपायुक्त व पोलीस कर्मचारी, पुणे कॅटॉन्मेंट बोडार्चे उपाध्याक्ष दिलीप गिरमकर, नगरसेवक अतुल गायकवाड ,सदानंद शेट्टी ,रवींद्र माळवदकर ,मोहनसिंग राजपाल आदी उपस्थित होते.
कॅन्टॉन्मेंट परिसरातील घरगुती व छोटी गणेश मंडळांनी ठरवून दिलेल्या हौदामध्ये विसर्जन करावे किंवा गणेशमुतार्चा पुनर्वापर करण्यासाठी मुर्ती हिंद मंडळाला देऊन पर्यावरण रक्षणाचे काम करावे, असे कॅटॉन्मेंट बोडार्चे उपाध्याक्ष गिरमकर यांनी आवाहन केले. तर कुरेशी समाजाचे हसन कुरेशी यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
शांतता समितीचे सदस्य विकास भांबुरे यांनी आभार मानले. तर गणेश उत्सव आणि बकरी ईद शांततेत पार पाडण्यासाठी समर्थ पोलिस ठाण्यात नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत आयुक्त रश्मी शुक्ला यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उत्सव काळात कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी नेमके काय करावे याबाबत आयुक्तांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना सुचना दिल्या आहेत.


