Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुणे फेस्टिव्हल कार फिएस्टामधील जुन्यास मोटारी बघण्यास पुणेकरांची गर्दी

Date:

पुणे-यंदा ‘पुणे फेस्टिव्हल कार फिएस्टा’ ही जुन्या मोटरींची विंटेज कार रैली विशेष आकर्षण ठरली. रविवार दि. ४ सप्टे. रोजी सकाळी ९.३० वाजता रेसिडेन्सी क्लब येथून ही रैली सुरु करण्यात आली. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी व सौ. मीरा कलमाडी यांनी  रैलीला प्रथम हिरवा झेंडा दाखवून रैलीची सुरुवात केली. या प्रसंगी सौ. पूनम व विशाल गोखले, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, महाराष्ट्रऑटोमोटिव स्पोर्ट्सअसोसिएशनचे अध्यक्ष व संयोजक श्रीकांत आपटे आदींनी देखील हिरवा झेंडा दाखवला.  

ही विंटेज कार रैली रेसिडेन्सी क्लब येथून निघाली पुणे कॅम्प, सदर्न कमांड, बंडगार्डन असा १० की. मी.चा प्रवास पूर्ण करून सकाळी ११.३० वाजता रेसिडेन्सी क्लब येथे परतली. यामध्ये योहान पूनावाला, जहीर वकील, अमूल्य व पंकज डहाणूकर, धनंजय बदामीकर, शंतनू देशपांडे,  मुंबईचे पराग राजदा,  फलटणचे रघुनाथ नाईक निंबाळकर, जयसिंह मारवाह,  जोनस पवार, शिरोळे कुटुंबीय आदींच्या विंटेज कार यामध्ये होत्या.

बेटली (१९६६), मर्सिडीज (१९७४) मर्सिडीज (१९८३), फियाट (१९३९), फियाट (१९५७), फियाट (१९६२), वोक्सवैगन (१९६७), जीप, फोर्ड जीप (१९४२), प्लायमाउथ (१९५४), प्लायमाउथ (१९५५), प्लायमाउथ (१९४७), बेंटली, ऑस्टिन मार्टिन, ट्रीयंप सुपर सेव्हन (१९३०), मौरीस (१९४६), फरारी, पोर्श,  शेवरलेट, बी.एम.डब्लू., हिल मिन्कस (१९५५), रोल्स रॉयस असे एकूण ५५ विंटेज कार्स यामध्ये होत्या. याचे संयोजन  महाराष्ट्र ऑटोमोटिव स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत आपटे यांनी केले. पुणे फेस्टिव्हलच्या  क्रीडा स्पर्धा समन्वयक प्रसन्न गोखले हे आहे. हॉटेल रेसिडेन्सी क्लब येथे बक्षीस वितरण संपन्न झाले.  संपूर्ण मार्गावर विंटेज कार रैली बघण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विमान वाहतूक कोसळली: काय म्हणाले मंत्री मोहोळ

इंडिगोने पायलटच्या कामाची वेळ पाळली नाही: ४ सदस्यीय चौकशी...

अजित पवारांबरोबर नाहीच , महाविकास आघाडी म्हणूनच लढणार, खुद्द शरद पवारांची मान्यता – प्रशांत जगताप

पुणे- गेल्या काही दिवसांपासून पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस...