17वा शनिवारवाडा नृत्य आणि संगीत महोत्सव 25 फेब्रुवारी रोजी

Date:

 

पुणे ः नृत्य, घुंगरू, संगीत, ताल, लय यांचा अजोड मिलाफ असलेला 17वा शनिवारवाडा नृत्य आणि संगीत महोत्सव ऐतिहासिक  शनिवारवाड्याच्या प्रांगणात रविवार, 25 फेब्रुवारी 2018 रोजी सायंकाळी 6.30 वाजता संपन्न होत आहे. पवित्र भट व सहकारी यांचा ‘श्रीरंगा द रिक्लाइनिंग लॉर्ड’ हा कार्यक्रम आणि नक्षत्र गुरुकुलाने सादर केलेले गोतिपुआ नृत्य हे या महोत्सवाचे यंदाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. शनिवारवाडा नृत्य आणि संगीत महोत्सव समिती अध्यक्षा सबीना संघवी यांनी ही माहिती दिली.

शनिवारवाडा नृत्य आणि संगीत महोत्सवाच्या या कार्यक्रमाच्या प्रवेशिका बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, टिळक स्मारक मंदिर, डीव्हीडी एक्सप्रेस-औंध आणि दि ओ हॉटेल-कोरेगांव पार्क येथे 16 ते 24 फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध असतील. तसेच कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी 11.00 वाजल्यापासून कार्यक्रमस्थळी प्रवेशिका उपलब्ध असतील. प्रवेशिकेची किंमत रु. 250 असून प्रथम येणार्‍यास प्राधान्य या तत्त्वावर आसनव्यवस्था असेल. तसेच www.bookmyshow.com या वेबसाइटवर ऑनलाईन बुकींग करता येतील.

कार्यक्रमाचा प्रारंभ पवित्र भट व सहकारी यांच्या ‘श्रीरंगा द रिक्लाइनिंग लॉर्ड’ या नृत्याच्या कार्यक्रमाने होईल. पवित्र भट यांनी देशात आणि परदेशातही अनेक भरतनाट्यम् कार्यशाळा आयोजित केल्या. ‘श्रीरंगा’ या कार्यक्रमात एका भक्ताचा पवित्र कावेरी नदीपासून सध्याच्या तामिळनाडू राज्यातील श्रीरंगम् येथील रंगनाथस्वामीपर्यंतचा प्रवास सादर केला आहे. भक्ताने मंदिरात प्रवेश करताक्षणी गरूड त्याचे स्वागत करतो. हा सर्व नृत्याविष्कार कार्यक्रम प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल.

यानंतर नक्षत्र गुरुकुलाने सादर केलेले गोतिपुआ नृत्य सादर होईल. नक्षत्र गुरुकुलाची स्थापना त्याचे संस्थापक संचालक गुरु बिजय कुमार साहू यांनी 2007 मध्ये भुवनेश्वर येथे केली. ओडिसी डान्सचा पूर्वावतार असलेले गोतिपुआ नृत्य हे स्त्रियांची वेशभूषा व पोशाख केलेली मुले सादर करतात. गोतिपुआचा ओडिया भाषेतील अर्थ गोती म्हणजे मुलगी आणि पुवा म्हणजे मुलगा आहे. यात नर्तक अनेक गुंतागुंतीच्या बंध (मुद्रा) करतो.

उमेशचंद्र बरिक, सब्यसाची साहू, जगमोहन साहू, कुणाल प्रधान, अनंत जेना, अभिषेक साहू आणि पबित्रा साहू हे गोतिपुआ नृत्य सादर करणार आहेत. हे मनोहर नृत्य पाहण्याची संधी पुणेकरांना प्रथमच मिळणार आहे.

यंदाच्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक पंचशील रिअ‍ॅलिटी हे असणार आहेत, तर 5 एफ वर्ल्ड, वेकफील्ड, मोर मिसचीफ, रेडिओ वन, दि ओ हॉटेल आणि प्युअर गोल्ड फाइन चॉकलेट हे या कार्यक्रमाचे सह प्रायोजक असतील.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाइपलाइन गॅस व सीएनजी वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश: विना अडथळा खोदकाम करता येणार

पुणे : केंद्र सरकारने देशभरात नैसर्गिक गॅस व पेट्रोलियम...

पुण्यात ४२४ प्रकरणांत गंभीर फेरफार अनियमितता:महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील ‘कलम १५५’ चा गैरवापर

दोषींवर निलंबनासह कठोर कारवाईचे महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश जबाबदार...

हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

शाहिरी-गायन-वादन सादरीकरणातून स्वराज्य संकल्पनेचा जागर पुणे, दि. २६ मार्च :महाराष्ट्र...

शिवसृष्टी प्रकल्पासह शहराच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका – नगरसेवक हर्षवर्धन मानकर

पुणे महानगरपालिकेच्या सन २०२६–२७ च्या अंदाजपत्रकावर झालेल्या चर्चेदरम्यान नगरसेवक...