पुणे- चलनातून एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय झाल्याने आता कोणा महाभागाने या नोटा चक्क कचऱ्यात टाकल्याचा एक प्रकार आज उघड झाला आहे. कचरा वेचणा-या महिलेला विधी महाविद्यालयासमोर एक हजार रुपयांच्या ५२ नोटा सापडल्या. या नोटा डेक्कन पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर माहिती अशी की, विधी महाविद्यालय रस्त्यावर कचरा गोळा करणाऱ्या शांताबाई ओव्हाळ यांना आज (गुरुवारी) सकाळी तब्बल ५२ हजार रुपयांच्या एक हजारांच्या नोटा सापडल्या आहेत. ओव्हाळ यांनी या नोटा महापालिकेच्या घनकचरा विभागाचे मुकादम खंडू कसबे यांच्याकडे दिल्यानंतर कसबे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात ही रक्कम जमा केली आहे.
ओव्हाळ या विधी महाविद्यालय रस्ता आणि प्रभात रस्ता परिसरात कचरा उचलण्याचे काम करतात. आज सकाळी साडेदहा वाजता कचरा जमा केल्यानंतर कांचनगल्ली परिसरात ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण सुरू असताना, त्यांना एका काळया रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवित एक हजार रुपयांच्या 52 नोटा आढळून आल्या.
कचरा वेचक महिलेला कचऱ्यात सापडल्या हजार पाचशेच्या ५० नोटा
Date:

