पुणे-केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी आज पुणे नवरात्रो महोत्सवाला भेट दिली यावेळी त्यांचा सत्कार अध्यक्ष आणि पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या हस्ते झाला त्यावेळी अभिनेत्री श्वेता शिंदे उपस्थित होत्या.यावेळी आपल्या नेहमीच्या गमतीदार शैलीत आठवले यांनी आपल्या भेटीचे रंग भरले .यावेळी कविता सदर केली तर काही राजकीय वक्तव्ये त्यांनी केली .
वाचा आठवलेंनी यावेळी काय कविता केली –
तुम्ही नेहमीच दिली आहे तुमच्या भागातील लोकांना वैचारिक दिशा
त्यामुळे तुम्ही आहात आमची आशा.
आमच्या पँथरची असायची गावागावात छावणी
त्यावेळी नेहमीच पहायचो लावणी
श्वेता शिंदे आहे आमची पाहुणी
मग का नाही बघायची लावणी
कलाकारांना उद्देशून ते म्हणाले
तुमचा डान्स आत्ता सुरु आहे
आमचा 2019मध्ये सुरू होईल.
आबा बागुलांना काय म्हणाले -आठवले
‘आबा तुम्ही सहा वेळा नगरसेवक झालात आता आमदार व्हा.
तिकडे (कॉंग्रेस मध्ये )जमत नसेल तर आमच्याकडे या’