पुणे- कला,संस्कृती, नृत्य,गायन, वादन यांचा मनोहारी संगम असणाऱ्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे शनिवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले.
श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्यास उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी वनमंत्री डॉ.पतंगराव कदम, माजी संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, आमदार शरदरणपिसे, पुणे मनपातील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते पक्षनेते अरविंद शिंदे, माजी आमदार उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, पी. ए. इनामदार, अंकुश काकडे, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संयोजक माजी उपमहापौर,नगरसेवक आबा बागुल, सौ.जयश्री बागुल, यांच्याबरोबरच सिनेतारका वंदना गुप्ते, सोनाली कुलकर्णी, श्वेता शिंदे, भार्गवी चिरमुले, गिरिजा जोशी, राधा सागर, गौरी नलावडे यांची उपस्थिती हे उद्घाटन सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले. यावेळी वंदना गुप्ते यांच्या ‘फॅमिली कट्टा’या पारदर्शित होणाऱ्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले. या चित्रपटातील कलाकार प्रतीक्षा लोणकर, अलोक राजवाडे, किरण करमरकर हेही यावेळी उपस्थित होते. प्रारंभीदीपप्रज्वलन व देवीची सामुहिक आरती झाली.
यावेळी जेष्ठ अभिनेते पद्मश्री डॉ.मोहन आगाशे, जेष्ठ संपादक अनंत दीक्षित,लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे, प्रसिध्द कवी व गीतकार जयंत भिडे आणि सामाजिक कार्याबद्दल संतोष शर्मा यांना श्री लक्ष्मीमाता कालासंस्कृती जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. ११ हजार रुपये रोख,स्मृतीचिन्ह देवीची प्रतिमा, शाल व श्रीफळ असे या पुरस्कारचे स्वरूप होते.
या महोत्सवाला शुभेच्छा देताना चव्हाण म्हणले की, राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल,पं. भीमसेन जोशी कलादालन, असे विविध उपक्रम आबा बागुल यांनी आपल्या भागात सुरु केले आहेत. नगरसेवक म्हणून कसे काम करावे याचे ते आदर्श उदाहरण आहे. जेष्ठ पत्रकार अनंत दिक्षित यांच्या भाषणाचा संदर्भ देत चव्हाण म्हणाले, बातम्या आणि जाहिराती यांचे संतुलन मालक विसरले आहेत. त्यामुळे वृत्तपत्रांसारख्या छापील क्षेत्राची घटिका आता भरली असून भविष्यातइलेक्ट्रोनिक्स किंवा डिजीटल माध्यमांना जास्त महत्व येणार आहे.
डॉ.पतंगराव कदम म्हणाले, महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातील निधी आपल्या वॉर्डात कसा आणायचा आणि मोठमोठी कामे कशी करायची हा आबा बागुलांचा आदर्श वाखाणण्याजोगा आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, कला, क्रीडा, शिक्षण, राजकीय क्षेत्र अशा विविध क्षेत्रात आबा बागुल यांनी आपल्या कामातून ठसा उमटविला आहे. काशी यात्रेच्या माध्यमातून आई-वडिलांचे आशिर्वाद घेणारा उपक्रम तर कौतुक करण्यासारखा आहे.
सत्काराला उत्तर देताना डॉ.मोहन आगाशे म्हणाले, आबा बागुल यांचे शिक्षण क्षेत्रातील काम व वृद्धांसाठीचे काम स्पृहणीय आहे. त्याबद्दल त्यांनाच पुरस्कार देणे आवश्यक आहे. पूर्वीची लावणी, राजकारण, शिक्षण क्षेत्र, कला क्षेत्र यामध्ये खूप बदल झाला असून हा विचार करण्याचा मुद्दा आहे असे त्यांनी सांगितले.
अनंत दिक्षित म्हणाले, डॉ.मोहन आगाशे आणि लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे यांच्याबरोबर पुरस्कार मिळाल्यामुळे आयुष्यातील कृतार्थता वाटते. प्रत्येक सामान्य माणसाच्या मनगटाला जोपर्यंत घामाचा वास येतो तोपर्यंत
धर्मसत्ता,राजसत्ता नाही तर समाज घडविण्याचे काम हा सामान्य माणूसच करेल. प्रज्ञा, प्रतिभा आणि विवेक यांचे सार्वजनिक स्वरूप दाखविण्याचा हा सोहळा आहे.
आबा बागुल यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात त्यांनी राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, राजीव गांधी ई-लर्निग स्कूल मध्ये अधिकाऱ्यांची मुले शिकण्यासाठी येत आहेत. या शाळेतील १५ मुळे आयआयटीमध्ये गेली आहेत. दोन वर्षांपूर्वी आपण स्मार्ट वॉर्ड ही संकल्पना राबविली. आता तारांगणाचे काम सुरु आहे. डिसेंबरमध्ये ते पूर्ण होईल. जगातील हे तिसरे तारांगण असेल. उल्हास पवार, वंदना गुप्ते यांची समयोचित भाषणे झाली. मंगला बनसोडे यांनीही आप्लेमानोगात व्यक्त केले.
त्यांनीयांनीही आपले मनोगात व्यक्त केले. त्या म्हणाल्या लावणी आणि तमाशाची कला लोप पावत चालली आहे.ती
जोपासण्याचे काम मी करते आहे. त्यांनी ‘पोटासाठी नाचते मी, पर्वा कोणाची ही लावणी गायली. प्रारंभी जया जोग यांच्या संकल्पनेतून साकारलेली सतार, व्हायोलीन व बासरी यांच्या जुगलबंदीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. नृत्यांगना शमा भाटे यांच्या शिष्यांनी गणेश वंदना व दुर्गां स्तुती सादर केली. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व सहकाऱ्यांनी नृत्य व गाण्यातून रखुमाई सादर केली. अभिनेत्री प्राजक्ता माळी व सहकाऱ्यांनी सादर केलेल्या आदिशक्तीचा जागर आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी , श्वेता शिंदे, भार्गवी चिरमुले, गिरिजा जोशी, राधा सागर, तेजा देवकर यांचा सहभाग असणाऱ्या व निकिता मोघे यांचे दिग्दर्शन असणाऱ्या दिलखेचक लावणीने प्रक्षेकांनी रंगमंच डोक्यावर घेतले. स्वप्नील रास्ते व मानसी पाटील यांनी सादर केलेल्या ‘फ्युजन’ने रसिकांची मने जिंकली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधीर गाडगीळ केले तर आभार घनश्याम सावंत यांनी मानले.
पहा फोटो …










