पुणे नवरात्रौ महोत्सवात कन्यापूजन उत्साहात
पुणे- नवरात्र उत्सव म्हणजे स्त्री शक्तीचा उत्सव. या उत्सवात कन्यापूजनाला अग्रस्थान आहे.. या उत्सवात कुमारिका पूजनाला महत्व असल्याने, आजही नवरात्रानिमित्त कन्यापूजन करून परंपरेचे जतंन केले जाते. पुणे नवरात्रौ महोत्सवातही मोठ्या थाटा माटात विधीवत कन्यापूजन करून स्त्री शक्तीला नमन करण्यात आले .
पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या वतीने कै वसंतराव बागुल उद्यानाजवळील श्री लक्ष्मीमाता मंदिरात विविध स्पर्धा, धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . उत्सवात स्त्रियांचा यथोचित गौरव करण्यासाठी कन्यापूजन आयोजित करण्यात आले होते . फुलांनी,विद्युतरोषणाईने सजवलेल्या मंडपात. कन्यापूजन संपन्न झाले भारत माता कि लक्ष्मीमाताकी जयजयकार करून पूजनास सुरुवात करण्यात आली.
ललिता पंचमीनिमित्त आयोजित कन्यापूजनात दरवर्षी दोन ते तीन हजार मुली सहभागी होतात. या वर्षीही पूजनास अवघ्या सहा महिन्याच्या मुलींपासून बारा वर्ष वयोगटातील मुली सहभागी झाल्या कार्यक्रमात महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल, जयश्री बागुल व बागुल परिवारातील सदस्यांच्या हस्ते सहभागी प्रत्येक मुलीची पाद्य पूजा करून त्यांचा शृंगार आणि नंतर त्यांचे औक्षण केले गेले . या प्रत्येक मुलीस देवी मानून त्यांच्या पायी नातमस्तक होऊन त्यांच्यावर फुलांची उधळण केली गेली . तसेच मुलींना दैनंदिन वापरासाठी उपयोगी पडतील अश्या भेट वस्तू देण्यात आल्या बिस्किटे, लाडू, चिप्स हा आवडीचा खाऊ देऊन त्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
कन्या पूजनाच्या निमिताने निरामय ग्रुप या सामाजिक संस्थेच्या लहान मुलींनी मंगळागौर कार्यक्रमाचे सुरेख सादरीकरण केले. पारंपरिक खेळांचा बाज असलेले सुंदर खेळ मुलींना माहित व्हावे. या साठी या मुलींनी हे खेळ सादर केले. यात सईबाईंचा कोंबडा, गाठोडं, घोडा, सासू सुनेचा भांडण, खडकावरच झुळझुळ पाणी, पद्मासन फुगडी, शिवाई रानफुले ताक काढू, धुणं, नववारी,नाकात नाथ अशा पारंपरिक वेशातील खेळांचे सादरीकरण सर्वांच्या कौतुकास पात्र ठरले.
कार्यक्रमाच्या सादरीकरणातून मिळणाऱ्या निधीचा उपयोग मुलींच्या शिक्षणासाठी करण्यात येणार आहे. मुलगा मुलगी एक सामान दोघांना हि शिकऊ छान, भ्रूण हत्त्या करू नका… पारंपरिक खेळातून ,आधुनिक संदेश यावेळी महोत्सव समितीच्या वतीने देण्यात आले.
या देवी सर्वभुतेषु शक्ती रूपेण संसंस्थिता
नमसात्स्ये नमो नमः
अर्थात या भूतलावर देवी शक्तीरूपात विराजमान आहे. म्हणून नवरात्रीत स्त्री रूपाची पूजा केली जाते. देवी भागवत पुराणातही कन्यापूजनाचे महत्व सांगण्यात आले आहे. कन्यांना देवीरूप मानून त्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. या प्रथेचे पालन केले जाते. देवी हि मांगल्याचे प्रतीक आहे. तिच्या पूजनाने सर्व मंगल होते, अशी श्रद्धा आहे, देवीकडून इष्ट सिद्धी प्राप्त करण्यासाठी तिच्या रूपांची पूजा केली जाते . महिला महोत्सवातही सर्व धार्मिक विधींसह कन्यांचे पूजन करण्यात आले. पूजनानंतर प्रत्येक कन्येस आकर्षक भेट वस्तू देण्यात आली. तसेच लकी ड्रॉ करण्यात आले. प्रथम, व्दितीय , तृतीय क्रमांकसाठी अनुक्रमे सायकल, स्टडी टेबल , घड्याळाचे तसेच चार उत्तेजनार्थ बक्षिसाचे वाटप करण्यात आले. आबा बागुल,जयश्री बागुल, निर्मला जगताप,योगिता निकम, सौ खलाटे,रेखा झानपुरे विधूलता साळी , कालिंदी भोसले, छाया कातुरे आदी यावेळी उपस्थित होते.

