कोरोनाच्या काळात पुणे महापालिकेने रिलायन्सवर केली ७२ कोटीची मेहेरबानी-आरोप (व्हिडीओ )

Date:

पुणे- ऐन कोरोनाच्या काळात सभागृहातील चालू ऑनलाईन मुख्य सभा महापौरांच्या अँटी चेंबर मधून घेणाऱ्या पुणे महापालिकेने कोरोनाच्याच काळात रिलायन्स जिओ वर तब्बल ७२ कोटीची मेहेरबानी केल्याचा आरोप करत कोणा कोणाला किती किती कोटी मिळाले असा सावळ जर मी उपस्थित केला तर काय वावगे झाले असाही प्रश्न आज उपस्थित करून महापालिकेतील सत्ताधारी भाजप पदाधिकारी आणि प्रशासनाला जोरदार दणका कॉंग्रेसचे माजी गटनेते ,नगरसेवक अरविंद शिंदे यांनी दिला आहे. आज शिंदे यांनी महापालिकेत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत रिलायन्स वर केलेल्या ७२ कोटीच्या मेहेरबानी चा मुद्दा उपस्थित  केला, ते म्हणाले,’रिलायन्स जिओ ने महापालिकेच्या पथ विभागाचे मुख्य अभियंता यांना 18 नोव्हेंबर २०२० रोजी पत्र देऊन , आपण शहरात आपल्या परवानगीने  ७०० किमी खोदाई करून ओएफसी केबल टाकलेल्या आहेत ,त्यातील ७० किमी च्या केबल २४ बाय ७ पाणीपुरवठा , एमजीएन एल , ड्रेनेज आणि एम एस ई डी सी एल च्या कामांमुळे खराब झाल्या असून त्यांची दुरुस्ती आम्ही स्वखर्चाने करू इच्छित असल्याचे कळविले .त्यास डिसेंबर मध्ये महापालिकेने कोणतीही शहानिशा न करता परवानगी दिली. यावेळी मुख्य सभा किंवा कसल्याही परवानगीची अगर कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली नाही . प्रत्यक्षात या कामांविषयी आम्ही चौकशी आणि विचारणा सुरु केल्यावर मात्र तातडीने रिलायन्स जिओ ला काम थांबविण्याचे आदेश देण्यात आले. आमच्या निदर्शनास असे आले कि , या कंपनीने ७०० किमी परवानगी घेऊन केलेल्या कामात या ७२ किमी अंतराचा समावेश नव्हता आणि हे वेगळेच काम असावे तिथे या कंपनीने वेगळ्याच नव्या केबल टाकल्या असाव्यात . वास्तविक पाहता या ७२   किमी  खोदाई साठी रीतसर असलेली रक्कम भरून त्यानंतर  परवानगी घेऊन हे काम होणे आवश्यक होते पण तसे काही झालेले नाही . या मागे भाजपचा एक पदाधिकारी असल्याचे समजते असा आरोप करत शिंदे यांनी मुख्य सभा महापौरांच्या अँटी चेंबर मधून होत असल्याने अशा भ्रष्टाचारी वृत्ती फोफावत असल्याचा आरोप केला आहे. पहा याबाबत नेमके अरविंद शिंदे काय म्हणाले ….

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...