पुणे- चार हि धरणात पुणे शहर आणि ग्रामीण भागाला पुरेसा एवढा पाणी साठा झाला आहे आता शहराची कपात रद्द करून रोज एकवेळ पाणीपुरवठा सुरु करा असा आदेश जरी महापौरांनी दिला असला तरी तो जुमानणार कोण असा प्रश्न विचारला जातो आहे . धरणातून पाणी सोडण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत . महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी हे दोघे हि राज्य सरकारच्या अधिपत्याखाली काम करीत असले तरी त्यांनी स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला पटेल असा योग्य निर्णय घेणे अपेक्षित आहे . भाजपा आणि राष्ट्रवादीच्या राजकारणात जिल्हाधिकारी नेमका कोणता निर्णय घेणार ? हे लवकरच दिसेल . तत्पूर्वी आज पहा महापौर प्रशांत जगताप या विषयावर काय म्हणाले …
पाणीकपात रद्द करा-महापौरांचे आदेश जुमानणार कोण?(महापौर प्रशांत जगताप काय म्हणाले … व्हिडीओ)
Date:

