पुणे- भाऊ रंगारी गणपतीने महापालिकेला १२५ वे वर्ष नसून हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे १२६ वे वर्ष आहे असे बजावल्यानंतर आणि हे पटवून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केल्यावर देखील त्यांना पुण्यातून दाद मिळेनासी झाली आहे. कॉंग्रेस ने आम्हाला या वादात पडायचे नाही अशी सावध भूमिका घेतली तर राष्ट्रवादीने यापासून चार हाथ दूर राहणेच पसंत केलेले दिसते आहे .यामुळे आता सध्या तरी भाऊ रंगारी मंडळाला न्यायालयाचाच काय तो आधार उरला आहे असे स्पष्ट चित्र आहे .
दरम्यान आज कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाऊ रंगारी गणपती सह केसरीवाडा आणि शहरातील विविध गणपतींचे दर्शन घेतले .त्यांच्या समवेत शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे,अभय छाजेड ,मोहन जोशी ,रवी धंगेकर,अजित दरेकर,विकी खन्ना ,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .कॉंग्रेसच्या या नेत्यांनी अखिल मंडई मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले तेव्हा चा हा व्हिडीओ रिपोर्ट ..जरूर पहा …
रंगारी कि टिळक ..? वादात पडायचे नाही ..कॉंग्रेसच्या अशोक चव्हाणांची सावध भूमिका (व्हिडीओ)
Date:



