Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

यंदा साडेअठ्ठावीस तास चालली मिरवणूक

Date:

पुणे- यंदा पुण्यातील विसर्जन मिरवणूक तब्बल २८ तास ३० मिनिटांनी संपली. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेली मिरवणूक शुक्रवारी दुपारी तीन वाजता संपली .पुणे इथे १७८० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मिरवणुकीने आणि पिंपरी चिंचवड  येथे २७९९ मंडळांनी मिरवणुकीने बाप्पांना निरोप दिला . विसर्जना पूर्वीच नगरसेवक भेगडे यांच्या खुनाचा कट पोलिसांनी उधळला असताना , लष्कर परिसरात मात्र नगरसेवक विवेक यादव यांच्यावर गोळीबार विसर्जन मिरवणुकीतच झाला. पोलिसांनी कष्ट घेतले.मात्र आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण सांभाळत त्यांना बंदोबस्ताचे काम करावे लागल्याचे स्पष्ट दिसत होते .

मानाचा  पहिला  कसबा गणपती गुरुवारी दुपारी २  वाजून २० मिनिटांनी अलका चौकात पोहोचला पण त्याचे विसर्जन झाले ४ वाजून २० मिनिटांनी …  तर त्यानंतर  तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या मूर्तीचे ५/४० ला  विसर्जन झाले. यानंतर मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाचे संध्याकाळी सहा वाजून ३३ मिनिटांनी, चौथा तुळशीबाग गणपती मंडळाचे सहा वाजून ५० मिनिटांनी आणि पाचवा केसरीवाडा गणपती मंडळाच्या मूर्तीचे सात वाजून २० मिनिटांनी विसर्जन झाले.
रात्री उशीरा बेलबाग चौकातून मिरवणुकीत सहभागी झालेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या मूर्तीचे शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता तर अखिल मंडई मंडळाच्या मूर्तीचे सकाळी सहा वाजून १० मिनिटांनी विसर्जन करण्यात आले. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या मूर्तीचे शुक्रवारी सकाळी सव्वाआठ् वाजता  विसर्जन करण्यात आले. शुक्रवारी दुपारी तीन वाजता रास्ता पेठेतील समर्थ मित्र मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. मिरवणुकीतील हे शेवटचे मंडळ होते.
राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात ‘श्रीं’च्या विसर्जनाचा सोहळा गुरूवारी मोठ्या दिमाखात पार पडला. पुण्याच्या संस्कृतीचे वैशिष्ट्य असलेल्या ढोलताशांच्या गजरातील पारंपरिक विसर्जन मिरवणुकांनी शहरातील रस्ते पावसातही  गजबजून गेले होते. राज्याच्या अन्य भागांप्रमाणे पुण्यातही पावसाने हजेरी लावली होती.  गुरुवारी सकाळी बेलबाग चौकात मानाच्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीने विसर्जन सोहळ्याचा उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी रस्त्यांवर अनेक ठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. पारंपारिक वाद्यांच्या व गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात मिरवणुकीस सुरूवात झाली. यावेळी ज्ञानप्रबोधनीचे शिस्तबद्ध ढोल पथक सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले.
चौकाचौकात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने पालखीतून काढण्यात आली. तसेच श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाची मिरवणूकही चांदीच्या पालखीतून काढण्यात आली. श्री गुरुजी तालीम मंडळाने मिरवणुकीसाठी तयार केलेला फुलांचा भव्य रथ लक्षवेधी ठरला. श्री तुळशीबाग मंडळाचाही रथ प्रेक्षणीय झाला होता. कसबा गणपतीचे कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. त्यानंतर तांबडी जोगेश्वरी मंडळ, गुरुजी तालीम मंडळ, तुळशीबाग आणि सर्वात शेवटी केसरीवाडा गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

 

14344773_1776147562641637_106912812904794477_n
पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी चोख बंदोबस्त हाताळला … त्यांना पोलीस दलाने हि उत्तम साथ दिली
14358927_1776160115973715_9129957051580310479_n
राष्ट्रवादी – भाजप फुगडी … ? महापौर प्रशांत जगताप आणि भाजपचे सरचिटणीस संदीप खर्डेकर यांनी फुगडी खेळून एन्जॉय केला .
14364864_1776160179307042_4635057295553793199_n
पाऊस असो वा काहीही … आम्हाला करायचे आहे आमचे काम .. मिडिया …
14364887_1776159915973735_1805433364182121145_n
हौशी मेयर साहेब फोटोला पोझ का नाही देणार बरे ?
14370156_1776160049307055_8746306758300133738_n
उपमहापौर तर मग ते उपमहापौर आहेत .. रंगत आले ..अन … मग असा डान्स केला .. उपमहापौर मुकारी अलगुडे
14370402_1776159985973728_6776287304685387874_n
बानू बया… बानू बया … .. महेश कोठारेंच्या ‘जय मल्हार ‘ प्रचंड लोकप्रियता दिल्यावर … विसर्जन मिरवणुकीत नुसती चमकत होती..लखलखाट… अभिनेत्री पुण्याचीच इशा केसकर ..

 

14316866_1401089119906140_4265842588015296268_n
एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला ही महापौरांसमवेत नाचतानाचासेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही .

t

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...