पुणे- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे आज सकाळी साडेआठ वाजता विसर्जन झाले . त्यानंतर पाठोपाठ मंडई च्या शारदा गजाननाचे विसर्जन झाले .
नेहमीप्रमाणे अनंत चतुर्थी उलटून गेली भाद्रपद पौर्णिमा लागली. मिरवणूक सुरु होवून २४ तास उलटून गेल्यानंतरही ‘अजय अतुल ‘ यांचे झिंग झिंग झीन्गाट.. दणाणतच होते.
दरम्यान काल विसर्जनाच्या दिवशी बेलबाग चौक ते अलका चौक या परिसरात तब्बल एक हजारहून अधिक मोबाईलची चोरी झाली आहे.पुण्यात काल संपूर्ण दिवसभरात बेलबाग चौक ते अलका चौक परिसरात वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये 1000 पेक्षा जास्त मोबाईलची चोरी झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाईल लंपास केले.तर काही पडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर विसर्जना पूर्वी उत्सव काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशा चे दर्शन घ्यायला गेलेल्या असंख्य भाविकांचे मोबाईल चोरीला गेल्याचे किंवा गहाळ झाल्याच्या तक्रारी विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंविल्या गेल्या आहेत .










